Kotwali Police Station : नगर : बायपास रोडवरील टोलनाक्याजवळ हातात लोखंडी धारदार कोयता घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या दोघांना कोतवाली पोलिसांच्या (Kotwali Police Station) गुन्हे शोध पथकाने (Crime Detection Squad) रविवारी (ता.१६) ताब्यात घेतले. यावेळी एका संशयिताकडून लोखंडी कोयता जप्त करण्यात आला. प्रितिम भाऊसाहेब लाळगे (वय २४, रा. दांगटमळा, चेतना कॉलनी, नवनागापूर, वडगाव गुप्ता, ता. जि. अहिल्यानगर) आणि नकुल विठ्ठल पवार (वय २६, रा. जेऊर बायजाबाई, न्हावी गल्ली, ता. जि. अहिल्यानगर) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.
धारदार कोयता घेऊन दहशत करीत असल्याची माहिती
कोतवाली पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथक रविवारी परिसरात पेट्रोलिंग करीत असताना पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांना बायपास रोडवरील टोलनाक्याजवळ दोन इसम हातात धारदार कोयता घेऊन दहशत करीत असल्याची माहिती मिळाली. त्यांनी पोलिस उपनिरीक्षक गणेश देशमुख यांना कारवाईचे आदेश दिले.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा.
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
पोलिसांनी दोघांना घेतले ताब्यात (Kotwali Police Station)
त्यानुसार पोलीस पथकाने कल्याण बायपास चौक ते पुणे बायपास चौकादरम्यान टोलनाक्याजवळ जाऊन पाहणी केली. त्यावेळी दोघेही संशयित हातात कोयता घेऊन परिसरात फिरत असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेत त्यांची पंचांसमक्ष झडती घेतली. त्यावेळी प्रितिम लाळगे याच्याकडे लोखंडी कोयता आढळून आला.
या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सचिन राजेंद्र लोळगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे आणि नगर शहर विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक गणेश देशमुख यांच्यासह कोतवाली पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पथकाने ही कारवाई केली.



