Kukadi Project : भोसेखिंड प्रकल्पासाठी कायमस्वरूपी आवर्तन उपलब्ध करावे : काकासाहेब तापकीर

सकारात्मक दृष्टीकोनातून निर्णय घेण्याची विनंती

0
Kukadi Project : भोसेखिंड प्रकल्पासाठी कायमस्वरूपी आवर्तन उपलब्ध करावे : काकासाहेब तापकीर
Kukadi Project : भोसेखिंड प्रकल्पासाठी कायमस्वरूपी आवर्तन उपलब्ध करावे : काकासाहेब तापकीर

Kukadi Project : कर्जत : कुकडी प्रकल्पातून (Kukadi Project) कर्जत तालुक्यातील भोसेखिंड प्रकल्पासाठी (Bhosekhind Project) कायमस्वरूपी आवर्तन उपलब्ध करावे अशी मागणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती काकासाहेब तापकीर (Kakasaheb Tapkir) यांनी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे आणि जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्याकडे केली. 

नक्की वाचा : शेतीपंपाच्या वीज बिलावरील व्याज माफ करुन उर्वरित रक्कमेला 50 टक्के सवलत दयावी; पिपाडा यांची मागणी

पाणीटंचाई उदभवण्याची दाट शक्यता

सध्या उन्हाळयाचे दिवस असून उन्हाच्या वाढत्या तापमानामुळे नैसर्गिक पाण्याचे जलस्रोताची पाण्याची पातळी खालावली जात आहे. तब्बल दीड महिना उन्हाळा बाकी असून अनेक गावात पाणीटंचाई उदभवण्याची दाट शक्यता आहे. सर्वसामान्य शेतकरी आणि नागरिकांना आगामी काळात पाण्यासाठी वणवण करावी लागेल. या अनुषंगाने भोसेखिंड प्रकल्पास कायमस्वरूपी कुकडी प्रकल्पातून आवर्तन उपलब्ध केल्यास भोसेखिंड प्रकल्प लाभक्षेत्रातील गावांचा कायमस्वरूपी प्रश्न मार्गी लागणार आहे. खांडवी, कोंभळी, निमगाव गांगर्डा येथील सीना धरण लाभक्षेत्र परिसरातील इतर गावे अवलंबून आहेत.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

सकारात्मक दृष्टीकोनातून निर्णय घेण्याची विनंती (Kukadi Project)

आजमितीस कुकडी प्रकल्पातील अतिरिक्त झालेले पाणीच या भागाला मिळते. वास्तविक पाहता ते देखील शेतीसाठी आणि पिण्यासाठी पाणी उपलब्ध होत असले तरी ते पुरेशा प्रमाणात मिळत नाही. त्यामुळे वरील भागातील सर्वसामान्य शेतकरी, नागरिक आणि खासकरून महिला भगिनींकडून कुकडी प्रकल्पातून भोसेखिंडीसाठी हक्काचे कायमस्वरूपी आवर्तन मिळावे अशी मागणी पुढे येत आहे. त्या अनुषंगाने कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती काकासाहेब तापकीर यांनी वरील मागणीचे निवेदन विधान परिषदेचे सभापती राम शिंदे आणि अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्याकडे सकारात्मक दृष्टीकोनातून निर्णय घ्यावा अशी विनंती केली आहे.