Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना मार्चचा हफ्ता कधी मिळणार? वाचा सविस्तर…

0
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना मार्चचा हफ्ता कधी मिळणार? वाचा सविस्तर…
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना मार्चचा हफ्ता कधी मिळणार? वाचा सविस्तर…

नगर : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) ही महायुतीची गेमचेंजर ठरली होती. मात्र या योजनेच्या लाभार्थी महिलांना अजूनही मार्चचा हप्ता (March Installment) देण्यात आलेला नाही. त्यामुळे महिलांच्या खात्यात पैसे कधी जमा होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. आता एकीकडे मार्चच्या हप्त्याबाबत प्रश्न विचारले जात आहेत तर दुसरीकडे मार्च आणि एप्रिलचा हप्ता (April Installment) एकत्र येणार असल्याची चर्चा सुरु आहे. याबाबत अजूनही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

नक्की वाचा: उद्धव ठाकरेंची मध्यरात्री भेट घेण्याच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री स्पष्टच म्हणाले की…

महिलांना १५०० की ३००० रुपये मिळणार (Ladki Bahin Yojana)

आता एप्रिल महिना संपत आला तरीही महिलांच्या खात्यात मार्चचाच हप्ता जमा झालेला नाही. त्यामुळे महिलांमध्ये मोठी नाराजी निर्माण झाली आहे. मार्चचा हप्ता जरी दिला तरीही एप्रिलचा हप्ता कधी येणार असा प्रश्न उद्भवतो. त्यामुळे या महिन्यात महिलांना १५०० रुपये की दोन महिन्याचे ३००० रुपये मिळणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

मागच्या अनेक महिन्यांपासून लाडकी बहीण योजनेचा हप्ता लांबणीवर जात आहे. महिलांच्या खात्यात दोन महिन्याचे हप्ते येतील,अशी शक्यता वर्तवण्यात येते. परंतु,महिन्याअखेरीस फक्त एकाच महिन्याचे पैसे जमा केले जातात. त्यामुळे या महिन्यात महिलांना नेमके किती पैसे मिळणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. याबाबत अधिकृत माहिती लवकरच दिली जाईल.

अवश्य वाचा: उन्हाळ्यात घराबाहेर पडताना महिलांनी त्वचेची काळजी कशी घ्यावी?

‘कोणत्या’ महिलांना मिळणार पैसे (Ladki Bahin Yojana)

लाडकी बहीण योजनेतून आता लाखो महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत.अनेक महिला निकषात बसत नाही तर लाखो महिलांनी केवायसीच  केलेली नाही. केवायसीमध्ये अपात्र ठरलेल्या महिलांच्या खात्यात आता पैसे येणं बंद झाले आहेत. अजून देखील अनेक महिला अपात्र होण्याची शक्यता आहे. त्या महिलांना ३० एप्रिलनंतर लाभ मिळणार नाही.