Landslide Occurred : नाशिक–पुणे महामार्गावरील चंदनापुरी घाटात कोसळली दरड; जीवितहानी टळली

पोलीस आणि मदतकार्य पथकाचे शर्थीचे प्रयत्न

0
Landslide Occurred : नाशिक–पुणे महामार्गावरील चंदनापुरी घाटात कोसळली दरड; जीवितहानी टळली
Landslide Occurred : नाशिक–पुणे महामार्गावरील चंदनापुरी घाटात कोसळली दरड; जीवितहानी टळली

Landslide Occurred : संगमनेर : नाशिक–पुणे राष्ट्रीय महामार्गावरील (Nashik–Pune National Highway) चंदनापुरी घाटात मंगळवारी (ता. ७) दुपारी एक मोठी दुर्घटना घडली. गेल्या काही दिवसांपासून परिसरात सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे (Due to heavy rainfall) दुपारी १२ ते १२.३० वाजण्याच्या सुमारास अचानक दरड कोसळल्याची (Landslide Occurred) घटना घडली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही, मात्र महामार्गावर मोठे दगड आणि मातीचा ढिगारा आल्याने वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला आहे.

नक्की वाचा : मुळा धरणात पाण्याची विक्रमी आवक; राजेंद्र पारखे यांची माहिती

वाहतुकीचा खोळंबा

घाटात दरड कोसळल्यामुळे डोंगरावरील भलेमोठे दगड आणि मलब्याचा ढिगारा थेट रस्त्याच्या मधोमध आला. यामुळे महामार्गावरील वाहतूक दोन्ही बाजूंनी पूर्णपणे ठप्प झाली. अचानक झालेल्या या प्रकारामुळे वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेनंतर काही वेळातच महामार्गाच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या कित्येक किलोमीटरपर्यंत लांबच लांब रांगा लागल्याचे पाहायला मिळाले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन, पोलीस प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापनाचे मदतकार्य पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

पोलीस आणि मदतकार्य पथकाचे शर्थीचे प्रयत्न (Landslide Occurred)

सुरक्षेचा उपाय म्हणून आणि कोंडी फोडण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलली. महामार्गाची एक बाजू सुरक्षित ठेवत, दोन्ही बाजूंची ये-जा करणारी वाहने एकाच बाजूने वळवून वाहतूक संथ गतीने सुरू ठेवण्यात आली आहे. रस्त्यावर आलेले मोठे दगड आणि मातीचा ढिगारा हटवण्यासाठी प्रशासनाकडून जेसीबी आणि इतर आधुनिक यंत्रसामग्री मागवण्यात आली आहे. ढिगाऱ्याचा आकार मोठा असल्याने तो हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. महामार्ग लवकरात लवकर पूर्णपणे मोकळा करून वाहतूक पूर्ववत करण्यासाठी पोलीस आणि मदतकार्य पथके शर्थीचे प्रयत्न करत आहेत.