LCB | घायवळ टोळीतील दोन फरार आरोपी जेरबंद; एलसीबीची धडक कारवाई

LCB | घायवळ टोळीतील दोन फरार आरोपी जेरबंद; एलसीबीची धडक कारवाई

0
LCB | घायवळ टोळीतील दोन फरार आरोपी जेरबंद; एलसीबीची धडक कारवाई
LCB | घायवळ टोळीतील दोन फरार आरोपी जेरबंद; एलसीबीची धडक कारवाई

LCB | नगर : पुण्यातील (Pune) कुख्यात घायवळ टोळीशी संबंधित आणि महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अंतर्गत दाखल गुन्ह्यांमध्ये फरार असलेल्या दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने कोल्हापूर व अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्ह्यातून ताब्यात घेतले आहे. या कारवाईमुळे गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये वॉन्टेड असलेल्या आरोपींचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले आहे.

हे वाचा – आज विधानभवनात अक्षय कर्डिले यांचा शपथविधी; जनतेचा आमदार म्हणून नव्या पर्वाची सुरुवात

२० लाख रुपयांची मागितली होती खंडणी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खर्डा (ता. जामखेड) येथील विजयसिंह कल्याणराव गोलेकर (वय ४५) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून खर्डा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपी रोहित उर्फ बबलु बाबासाहेब गोलेकर याने फिर्यादीला मोबाईलवर संपर्क साधून, पुण्यातील संघटित गुन्हेगारीच्या प्रकरणात मदत न केल्याचा आरोप करत २० लाख रुपयांची खंडणी मागितली होती. तसेच खंडणी न दिल्यास गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी दिल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

कोल्हापूर जिल्ह्यातून सापळा रचून घेतले ताब्यात (LCB)

या प्रकरणाचा तपास सुरू असताना पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे तसेच पोलीस अंमलदार राहुल द्वारके, फुरकान शेख, शामसुंदर जाधव, राहुल डोके, अमोल आजबे, मनोज साखरे, प्रशांत राठोड, सतीश भवर आणि चालक महादेव भांड यांचे विशेष पथक तयार करण्यात आले.

तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपी रोहित बाबासाहेब गोलेकर (वय २७, रा. खर्डा, ता. जामखेड) हा कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूपुरी पोलीस ठाणे हद्दीत वास्तव्यास असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने २१ जून रोजी यड्राव फाटा परिसरात सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

तपासात रोहित गोलेकर हा पुणे शहरातील वारजे माळवाडी आणि कोथरूड पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या मोक्का अंतर्गत गंभीर गुन्ह्यांमध्ये फरार असल्याचे निष्पन्न झाले.

आरोपीविरुद्ध गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे प्रलंबित (LCB)

दरम्यान, कोथरूड पोलीस ठाण्याच्या अभिलेखावरील फरार आरोपी ज्ञानेश्वर उर्फ माऊली दगडू तोंडे (वय ४०, रा. खेचरे, ता. मुळशी, जि. पुणे) हा मिरजगाव परिसरातील सोलापूर-अहिल्यानगर महामार्गावरील उड्डाणपुलाखाली थांबलेला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पथकाने त्यालाही ताब्यात घेतले. तपासात त्याच्याविरुद्ध कोथरूड पोलीस ठाण्यातील गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे प्रलंबित असल्याचे समोर आले.

पोलिसांच्या माहितीनुसार, रोहित उर्फ बबलु गोलेकर याच्याविरुद्ध सात, तर ज्ञानेश्वर उर्फ माऊली तोंडे याच्याविरुद्ध सहा गंभीर गुन्हे दाखल आहेत. दोघेही पुण्यातील कुख्यात घायवळ टोळीशी संबंधित असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

ताब्यात घेतलेल्या आरोपींपैकी रोहित गोलेकर याला पुढील तपासासाठी खर्डा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून, ज्ञानेश्वर उर्फ माऊली तोंडे याला पुणे शहर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे तसेच त्यांच्या पथकाने केली.