
नगर : अहिल्यानगर जिल्ह्यात जबरी चोरी करणाऱ्या सराईत टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने (Local Crime Branch) जेरबंद केले असून आरोपींकडून तब्बल १० गुन्हे उघडकीस आणण्यात आले आहेत. पोलिसांनी आरोपींकडून ११ लाख १९ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा २१ एप्रिल रोजी गुन्हा दाखल (Case Registered) करण्यात आला होता. फिर्यादी ताराबाई मुरलीधर कोकाटे या शेतात काम करत असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील सुमारे ७८ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने (Gold Jewelry) जबरीने चोरून नेले होते.
नक्की वाचा : भिंगार पोलिसांचे तोफखाना, एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीत जुगार अड्ड्यांवर धाडसत्र; २० जण ताब्यात
तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे तपास
या गुन्ह्याच्या तपासासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाची स्थापना करण्यात आली होती. पथकाने घटनास्थळाची पाहणी करून तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे तपास सुरू केला. तपासादरम्यान हा गुन्हा गणेश दिवानजी काळे (रा. वाकोडी) याने साथीदारांसह केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी वाकोडी येथील जुना जकात नाका परिसरात सापळा रचला. तेथे दोन दुचाकी संशयित दिसून आल्याने पोलिसांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
मुद्देमाल हस्तगत (Local Crime Branch)
ताब्यात घेतलेल्या आरोपींमध्ये गणेश दिवानजी काळे (वय २८, रा. वाकोडी), विनय उर्फ टकल्या योगेश काळे (वय १९, रा. वाळुंज) आणि रोहित लल्या भोसले (वय २३, रा. सराटी वडगाव, ता. आष्टी, जि. बीड) यांचा समावेश आहे. चौकशीदरम्यान गणेश काळे याने आणखी दोन साथीदारांच्या मदतीने चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली.पोलिसांनी आरोपींकडून १०२ ग्रॅम वजनाचे ९ लाख ४ हजार ८०० रुपयांचे सोन्याचे दागिने, ४५ हजार रुपयांचे तीन मोबाईल फोन तसेच १ लाख ७० हजार रुपयांच्या दोन दुचाकी असा एकूण ११ लाख १९ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.
आणखी १० गुन्हे उघडकीस
तपासादरम्यान आरोपींवर अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये आणखी १० गुन्हे दाखल असल्याचे उघडकीस आले आहेत. मुख्य आरोपी गणेश काळे याच्याविरुद्ध यापूर्वीही अहिल्यानगर व बीड जिल्ह्यात घरफोडी, चोरी आणि मारहाणीचे अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तसेच आरोपी रोहित भोसले याच्याविरुद्धही पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद असल्याचे समोर आले आहे.
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिष भोये, महादेव गुट्टे, पोलीस अंमलदार गणेश लोंढे, फुरकान शेख, श्यामसुंदर जाधव, बाळासाहेब खेडकर, भाऊसाहेब काळे, किशोर शिरसाठ, मनोज साखरे, सुनिल मालणकर, आकाश काळे, बाळासाहेब गुंजाळ, योगेश कर्डिले, महिला पोलीस अंमलदार भाग्यश्री भिटे, किरण ठुबे, चालक भगवान धुळे, अरुण मोरे यांच्या पथकाने केली आहे.


