Local Crime Branch : नगर : शेवगाव शहरातील (Shevgaon City) कोरडे वस्ती परिसरात पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या बेकायदा मावा निर्मितीच्या अड्ड्यावर अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने (Local Crime Branch) छापा टाकला. या कारवाईत मावा तयार करणाऱ्या दोन जणांना ताब्यात घेण्यात आले असून, दोन इलेक्ट्रीक मशीन, सुगंधीत तंबाखू, सुपारी चुरा, तयार मावा तसेच दोन कार असा एकूण १८ लाख ३३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. वसीम सत्तार तांबोळी (वय ३८, रा. श्रीरामपूर, हल्ली शेवगाव) आणि शाहरूख उर्फ जावेद सलीम शेख (वय २७, रा. शेवगाव), असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींची (Suspect Accused) नावे आहेत.
माहितीची खात्री करून शेडवर टाकला छापा
अवैध व्यवसायांविरोधात कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करण्यात आले होते.
दरम्यान, २८ ऑगस्ट रोजी हे पथक शेवगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध व्यवसायाची माहिती घेत असताना, कोरडे वस्ती परिसरातील एका पत्र्याच्या शेडमध्ये मशीनच्या साहाय्याने सुगंधीत तंबाखू आणि सुपारीचे मिश्रण करून मावा तयार केला जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली. माहितीची खात्री करून पोलिसांनी पंचांसमक्ष शेडवर छापा टाकला.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा.
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
मावा कारमधून नेऊन विक्री (Local Crime Branch)
यावेळी वसीम सत्तार तांबोळी (वय ३८, रा. श्रीरामपूर, हल्ली शेवगाव) आणि शाहरूख उर्फ जावेद सलीम शेख (वय २७, रा. शेवगाव) हे दोघे इलेक्ट्रीक मशीनवर मावा तयार करताना आढळून आले. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. पोलिसांच्या चौकशीत हा मावा आसिफ रहेमान तांबोळी (रा. भगतसिंग चौक, शेवगाव) याच्या सांगण्यावरून तयार केला जात असल्याचे समोर आले. तयार झालेला मावा कारमधून नेऊन विक्री केला जात असल्याची माहितीही तपासात मिळाल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, आसिफ तांबोळी हा फरार असून त्याचा शोध सुरू आहे.
या कारवाईत पोलिसांनी दोन इलेक्ट्रीक मशीन, ६५ किलो सुगंधीत तंबाखू, ८० किलो तयार मावा, ८०० किलो सुपारी चुरा, ३० किलो सुगंधीत तंबाखू, ५ किलो कलर, दोन वजनकाटे आणि दोन कार असा एकूण १८ लाख ३३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास शेवगाव पोलीस करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे तसेच पोलीस अंमलदार गणेश लोंढे, निळकंठ कारखेले, रणजीत जाधव, रोहित येमुल, सतीष भवर आणि बाळासाहेब गुंजाळ यांच्या पथकाने केली.



