
Local Crime Branch : नगर : अहिल्यानगर शहरातील कोतवाली पोलीस ठाण्याच्या (Kotwali Police Station) हद्दीत घरातून सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर स्थानिक गुन्हे शाखेने (Local Crime Branch) छापा टाकून दोन महिलांची सुटका केली. या प्रकरणी एका ४४ वर्षीय महिलेविरुद्ध गुन्हा दाखल (Case Registered) करण्यात आला आहे.
नक्की वाचा : कर्जमाफीच्या १०२ कोटींपैकी ४८ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा; आमदार कर्डिले यांची माहिती
वेश्याव्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती
अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध व्यवसायांविरोधात कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या आहेत. त्यानुसार प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक कल्पना पवार आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करण्यात आले होते. शुक्रवारी(ता.३)सप्टेंबर रोजी पथक कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध व्यवसायाबाबत माहिती घेत असताना, संजीवनी कॉलनी, पानसरेवाडा, रेल्वे स्टेशन परिसरातील एका घरातून वेश्याव्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली.माहितीची खात्री करण्यासाठी पोलिसांनी एका कर्मचाऱ्याला बनावट ग्राहक म्हणून पाठविले.
वेश्याव्यवसाय सुरू असल्याची खात्री झाल्यानंतर पोलिसांनी पंचांसमक्ष संबंधित घरावर छापा टाकला. यावेळी झिनत फैय्याजअली महंमद (वय ४४, रा. संजीवनी कॉलनी, पानसरेवाडा, रेल्वे स्टेशन, अहिल्यानगर) हिला ताब्यात घेण्यात आले.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (Local Crime Branch)
घराची झडती घेतली असता दोन महिला आढळून आल्या. चौकशीत या महिलांनी त्यांना झिनत महंमद हिने वेश्याव्यवसायासाठी आणल्याचे पोलिसांना सांगितले. ग्राहकांकडून पैसे घेऊन त्यातील काही रक्कम त्यांना देत असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही महिलांची सुटका केली. या प्रकरणी झिनत फैय्याजअली महंमद हिच्याविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास कोतवाली पोलीस ठाण्याचे पथक करीत आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक संदिप दरवडे व पोलीस अंमलदार विष्णु भागवत, योगेश भिंगारदिवे, विकास साळवे, सागर ससाणे व महिला पोलीस अंमलदार भाग्यश्री भिटे यांच्या पथकाने केली आहे.


