नगर : राज्यात आज (ता.६) दिवसभर दमदार पावसाने हजेरी लावली आहे. मुंबईसह पुण्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस (Heavy Rain) सुरू असून वाहतूक व्यवस्था कोलडमडल्याचं दिसून येत आहे. पावसामुळे लोणावळा (Lonavala Rain) आणि मावळ तालुका परिसरात धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षेसाठी पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी (Jitendra Dudi) यांनी लोणावळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ अंतर्गत आदेश (Order under Section 163) लागू केले आहेत.
नक्की वाचा : इंद्रायणीला पूर, माऊलींच्या पालखीसाठी आळंदीत येणाऱ्या वारकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना
कलम १६३ म्हणजे पर्यटनावर बंदी नसून पर्यटकांसाठी सुरक्षेच्या दृष्टीने निर्बंध लावण्यात आलेत. ६ जुलै रात्री १२ वाजल्यापासून ३१ जुलैला सकाळी ६ वाजेपर्यंत हे निर्बंध लागू राहणार आहेत. त्यामुळे,आता लोणावळ्यात येणाऱ्या पर्यटकांना धबधब्याच्या ठिकाणी किंवा धोकादायक पॉईंटवर जाता येणार नाही. तसेच, अशा ठिकाणी जाऊन सेल्फी काढणे किंवा व्हिडिओग्राफी, रिल्स बनवणे बंधनकार करण्यात आलं आहे.
अवश्य वाचा : देशातील ५८ इंजिनीअरिंग महाविद्यालयांना कुलूप का? विद्यार्थ्यांचं काय होणार?
अतिवृष्टीमुळे पर्यटनस्थळी धोका (Lonavala Rain)

लोणावळ्यातील एकवीरा देवी, भुशी धरण, लायन्स पॉईंट, टायगर पॉईंट, पवना धरण, लोहगड, विसापूर, तिकोना, तुंग किल्ला आणि इतर पर्यटनस्थळांवर मोठ्या प्रमाणात पर्यटक येत आहेत. मात्र, अतिवृष्टीमुळे अपघातांचा धोका वाढल्याने प्रशासनाने हे निर्बंधांचे पाऊल उचलले आहे. पर्यटकांनी पावसाळ्यातील पर्यटनाचा आनंद घेताना जीव धोक्यात घालू नका, असे आदेश पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी दिलेत. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
पर्यटकांवर कोणते निर्बंध? (Lonavala Rain)
– ६ जुलै मध्यरात्री ते ३१ जुलै सकाळी ६ वाजेपर्यंत १६३ कलम लागू
– धबधबे, ओढे, नदी, धरणात उतरण्यास बंदी
– धोकादायक कड्यांवर सेल्फी, व्हिडिओ शूटिंगला मनाई
– नैसर्गिक धबधब्यांमध्ये प्रवेशास बंदी
– मद्यपान, ध्वनीप्रदूषण, कचरा टाकण्यास बंदी
– महिलांची छेडछाड, बेजबाबदार वाहनचालकांवर कारवाई
– धरण आणि नदीकाठ परिसरात चारचाकी आणि सहाचाकी वाहनांना प्रवेशबंदी



