Maharashtra Epstein Files : ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’मधील भोंदूबाबाचे रहस्य उलगडले!‘कॅप्टन तुम्ही, मी नौका…’ गाणे आणि टिझरसह मनोज जोशींचा उत्कंठावर्धक लूक रिव्हील…

Maharashtra Epstein Files : ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’मधील भोंदूबाबाचे रहस्य उलगडले!‘कॅप्टन तुम्ही, मी नौका...’ गाणे आणि टिझरसह मनोज जोशींचा उत्कंठावर्धक लूक रिव्हील...

0

Maharashtra Epstein Files : घोषणेपासूनच चर्चेचा केंद्रबिंदू ठरलेल्या ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’ (Maharashtra Epstein Files) या आगामी मराठी चित्रपटाने (Marathi Cinema) राजकीय वर्तुळासह विविध क्षेत्रांतील दिग्गजांचे लक्ष वेधून घेतले आहे. महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक विश्वातील कथित वादग्रस्त घडामोडींना रुपेरी पडद्यावर आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या या चित्रपटात नेमके कोणाचे बुरखे फाटणार? कोणाची गुपिते उघड होणार? कोणाच्या पडद्यामागील कारनाम्यांचा पर्दाफाश होणार? अशा अनेक प्रश्नांनी रसिकांच्या मनात कुतूहल निर्माण केले आहे. शीर्षकापासूनच रहस्याची किनार लाभलेल्या या चित्रपटातील व्यक्तिरेखा आणि त्यांच्या कथित वास्तवातील संदर्भांबाबत तर्कवितर्कांना उधाण आले आहे. अशातच आता चित्रपटातील ‘कॅप्टन तुम्ही मी नौका, तुमच्या प्रेमाचा टेबल टाका…’ या गाण्यासोबतच कथित भोंदूबाबाचे पहिले पोस्टरसह टिझर प्रदर्शित (Teaser Released) करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली असून, या सिनेमाबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

Maharashtra Epstein Files : ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’मधील भोंदूबाबाचे रहस्य उलगडले!‘कॅप्टन तुम्ही, मी नौका...’ गाणे आणि टिझरसह मनोज जोशींचा उत्कंठावर्धक लूक रिव्हील...
Maharashtra Epstein Files : ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’मधील भोंदूबाबाचे रहस्य उलगडले!‘कॅप्टन तुम्ही, मी नौका…’ गाणे आणि टिझरसह मनोज जोशींचा उत्कंठावर्धक लूक रिव्हील…

भोंदूगिरीचा करणाऱ्या प्रवृत्तींवर परखड भाष्य

आनंदी पिक्चर्स अमरावती आणि सचिन रोडे पाटील प्रस्तुत ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’ या मराठी चित्रपटाची निर्मिती मातोश्री एन्टरटेन्मेंट वर्ल्डच्या बॅनरखाली करण्यात आली आहे. देवेंद्र भट, सूर्यकांत भुंडे आणि प्रशांत कदमपुरे यांनी या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा सांभाळली आहे. दिग्दर्शक स्वरूप सावंत यांनी या चित्रपटाच्या माध्यमातून समाजात फोफावलेल्या भोंदूगिरीचा पर्दाफाश करत अशा प्रवृत्तींवर परखड भाष्य केले आहे. चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवादांची जबाबदारी संजय नवगिरे यांनी समर्थपणे पेलली असून संकल्पना सागरकुमार एस. जैन यांची आहे. पुणे येथील लेमन ट्री हॉटेलमध्ये आयोजित एका दिमाखदार सोहळ्यात चित्रपटातील ‘कॅप्टन तुम्ही मी नौका, तुमच्या प्रेमाचा टेबल टाका…’ हे गाणे प्रदर्शित करण्यात आले.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

भोंदूबाबाचा चित्रपटातील लूक रिव्हील(Maharashtra Epstein Files)

याच सोहळ्यात चित्रपटातील कथित भोंदूबाबाचा चित्रपटातील लूक रिव्हील करण्यात आला आहे. संजय नवगिरे यांच्या लेखणीतून साकारलेल्या या गीताला रोहित नागभिडे यांनी संगीतसाज चढवला असून, मुग्धा कऱ्हाडे यांच्या आवाजाने त्याला खुमासदार रंगत आणली आहे. शब्दाशब्दांत सूचक अर्थ, सुरासुरांत मिश्कीलपणा आणि ठेक्याठेक्यात उपरोधाची धार असलेले हे गाणे केवळ मनोरंजनापुरते मर्यादित नाही. ‘कॅप्टन’ आणि ‘नौका’ या रूपकांतून नेतृत्व, संधीसाधूपणा आणि सत्तेभोवती फिरणाऱ्या नातेसंबंधांवर मार्मिक भाष्य करण्याचा प्रयत्न यात करण्यात आला आहे. कथानकातील राजकीय-सामाजिक संदर्भांना संगीताच्या माध्यमातून अधोरेखित करणारे हे गीत मुग्धा कऱ्हाडे यांच्या ठसकेबाज गायकीमुळे अधिकच श्रवणीय बनले आहे. साहिल साह यांनी नृत्य दिग्दर्शन केलेल्या या गाण्यावर तानिया चॅटर्जी यांनी अप्रतिम नृत्य सादर केले आहे.

Maharashtra Epstein Files : ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’मधील भोंदूबाबाचे रहस्य उलगडले!‘कॅप्टन तुम्ही, मी नौका...’ गाणे आणि टिझरसह मनोज जोशींचा उत्कंठावर्धक लूक रिव्हील...
Maharashtra Epstein Files : ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’मधील भोंदूबाबाचे रहस्य उलगडले!‘कॅप्टन तुम्ही, मी नौका…’ गाणे आणि टिझरसह मनोज जोशींचा उत्कंठावर्धक लूक रिव्हील…

गाण्याइतकाचा भोंदूबाबाचा लूकही लक्षवेधी ठरला आहे. मागील काही दिवसांपासून प्रेक्षकांच्या मनात कुतूहल निर्माण केलेले भोंदूबाबाच्या पाठमोऱ्या गूढ पोस्टरवील चेहरा प्रकाशझोतात आला आहे. या भूमिकेसाठी मनोज जोशी यांना केलेला लूक खऱ्या अर्थाने खूप वेगळा असून, याच गेटअपमध्ये त्यांनी कार्यक्रमांत एन्ट्री करीत सर्वांचे लक्ष वेधले. पाठमोऱ्या पोस्टरवर झळकलेले ‘पडद्याआड लपलेला वादग्रस्त चेहरा उघड होतोय…!!! लवकरच…’ हा संदेश तंतोतंत खरा ठरला आहे. या शब्दांतून पडद्याआड दडलेल्या कथित कारस्थानांचा आणि त्यामागील चेहऱ्यांचा पर्दाफाश करण्याचे संकेत देण्यात आले होते. त्या बहुचर्चित पोस्टरमध्ये पाठमोऱ्या दिसणाऱ्या भोंदूबाबाच्या भूमिकेत दुसरे-तिसरे कोणी नसून अभिनेते मनोज जोशी झळकणार असल्याचे उघड झाले आहे. त्यांच्या जोडीला अभिनेत्री दीपाली सय्यद महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार असून, त्यांचा लूक यापूर्वीच उघड करण्यात आला होता. मात्र, मनोज जोशी यांचा चेहरा मुद्दाम दडवण्यात आल्याने त्यांच्या व्यक्तिरेखेचे नेमके स्वरूप काय असेल आणि हा भोंदूबाबा कथानकात कोणते रहस्य उलगडणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती.

या चित्रपटात मनोज जोशी, दीपाली सय्यद, सुबोध भावे, उदय टिकेकर, अक्षय टंकसाळे, माधुरी पवार, सुरेश विश्वकर्मा, भारत गणेशपुरे, अनिल नगरकर, मोनिका, शिवराज वालवेकर, सिद्धेश्वर झाडबुक्के, श्रेया कुलकर्णी, राहुल बेलापूरकर इत्यादी कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. छायाचित्रणाच्या माध्यमातून चित्रपटाला दृश्यात्मक उठाव देण्याचे काम आकाश काकडे यांनी केले आहे, तर अक्षय आंबेकर यांनी कलादिग्दर्शनातून कथानकाला साजेसा दृश्याविष्कार घडवला आहे. अपेक्षा गांधी सोनी यांनी वेशभूषेची धुरा सांभाळली असून, निर्मितीच्या नियोजनाची जबाबदारी नेहा घोडके यांनी प्रॉडक्शन कंट्रोलर म्हणून, तर सचिन घनवट यांनी प्रॉडक्शन हेड म्हणून पार पाडली आहे. लाईन प्रोड्युसर यश सणस आहेत तर विजय म्हस्के यांनी प्रॉडक्शन मॅनेजर म्हणून काम पाहिले आहे.