नगर : राज्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांच्या (Maharashtra School Holiday) सुट्ट्यांचे वेळापत्रक (Holiday Schedule) जाहीर करण्यात आले आहे. राज्य शिक्षण विभागाकडून शैक्षणिक वर्ष २०२६ -२७ मधील शाळांच्या सत्राबाबत आणि सुट्ट्यांबाबत परिपत्रक जारी करण्यात आलं आहे. राज्य शिक्षण विभागाच्या (State Education Department) आदेशानुसार, दिवाळी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना १३ दिवसांची दिवाळी सुट्टी मिळणार आहे.
नक्की वाचा : साईचरणी गुप्त दात्याकडून २७ लाखांची अनमोल भेट; संगमरवरी शिळांवर सोन्याच्या कोटिंगमध्ये कोरली साईबाबांची ११ वचने
२ ते १४ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत सुट्टी (Maharashtra School Holiday)

राज्यातील सर्व शाळांना दिवाळीनिमित्त २ नोव्हेंबर ते १४ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत सुट्टी असणार आहे. या सुट्ट्यांनंतर सोमवार १६ नोव्हेंबरपासून राज्यातील शाळांमध्ये नियमित वर्ग पूर्ववत सुरू होऊन शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या दुसऱ्या सत्राला प्रत्यक्ष प्रारंभ होणार आहे. तर राज्यातील सर्व शाळांना ३ मे ते १४ जून २०२७ या काळात नेहमीप्रमाणे उन्हाळी सुट्टी लागू राहणार आहे. या सुट्टीचा कालावधील ४३ दिवसांचा असेल. राज्य शिक्षण विभागाने राज्यातील सर्व शाळांचे दिवाळी आणि उन्हाळी सुट्ट्यांबाबतचे अधिकृत वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे.
अवश्य वाचा : दुष्काळमुक्तीचा अण्णा हजारेंचा ‘राळेगण पॅटर्न’! विशेष निवारण आराखडा तयार
शिक्षण विभागाचा आदेश काय? (Maharashtra School Holiday)
शिक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार, चालू शैक्षणिक वर्षाचे पहिले सत्र १५ जून ते ३१ ऑक्टोबर दरम्यान पूर्ण होत आहे. तर दुसरे सत्र १६ नोव्हेंबर २०२६ ते १ मे २०२७ या कालावधीत चालणार आहे. त्यानंतर ३ मे ते १४ जून २०२७ या काळात विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्टी लागेल. शिक्षण विभागाने जाहीर केलेल्या यंदाच्या दिवाळी सुट्ट्यांच्या कालावधीत ६ नोव्हेंबर रोजी धनत्रयोदशी, १० नोव्हेंबरला दिवाळी पाडवा व बलीप्रतिपदा तसेच ११ नोव्हेंबर रोजी भाऊबीज हे मुख्य सण येत आहेत.
शिक्षण विभागाने अशा देखील सूचना दिल्या आहेत की, शाळा व्यवस्थापनाने या सुट्ट्यांच्या वेळापत्रकात परस्पर अथवा स्वेच्छेने कोणताही बदल करू नये. स्थानिक पातळीवरील सण अथवा अपरिहार्य कारणास्तव तारखांमध्ये फेरबदल करायचा असल्यास संबंधित शाळांना शिक्षण विभागाची रीतसर पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक असेल. दिवाळीच्या सुट्ट्यांचे नियोजन शासनाकडून वेळेत जाहीर झाल्यामुळे शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांना आगामी सणांचे औचित्य साधून आपल्या कौटुंबिक प्रवासाचे आणि सुट्ट्यांचे पूर्वनियोजन करणे अधिक सोपं झालं आहे.



