Manoj Bajpayee : मनोज बाजपेयीच्या नव्या चित्रपटाची घोषणा ;पोस्टर रिलीज

मनोज बाजपेयी हा 'भैय्याजी' नावाच्या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. त्याचा फर्स्ट लूक प्रदर्शित झाला असून त्यातील मनोजची भूमिका चाहत्यांच्या कौतुकाचा विषय आहे.

0
Manoj Bajpayee
Manoj Bajpayee

नगर : बॉलीवूडमधील चतुरस्त्र अभिनेता म्हणून मनोज बाजपेयीकडे पहिले जाते. आता मनोज एका नव्या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. अखेर त्याने पोस्ट शेयर करुन चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. मनोज हा ‘भैय्याजी’ (Bhaiyyaji) नावाच्या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. त्याचा फर्स्ट लूक प्रदर्शित (First Look) झाला असून त्यातील मनोजची भूमिका चाहत्यांच्या कौतुकाचा आणि तितक्याचं कुतूहलतेचा विषय देखील आहे.  

नक्की वाचा : उर्फी जावेद करणार बॉलिवूडमध्ये एन्ट्री ;’या’ चित्रपटात झळकणार

मनोज बाजपेयीच्या शंभराव्या प्रोजेक्टची घोषणा (Manoj Bajpayee)

आपल्या आगळ्या वेगळ्या धाटणीच्या अभिनयासाठी ओळखला जाणारा अभिनेता म्हणून मनोज बाजपेयीकडे पाहिले जाते. त्याच्या शूल, सत्या, गँग्स ऑफ वासेपूर, द फॅमिली मॅन, जोराम सारख्या कलाकृतीतून देखील प्रेक्षकांच्या कौतुकाचा विषय ठरला आहे. आता मनोजने त्याच्या शंभराव्या प्रोजेक्टची घोषणा केली आहे. आपल्या निवडक भूमिका आणि वैचारिक बैठक यासाठी लोकप्रिय असणाऱ्या मनोज बाजपेयीला चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. त्याच्या जोराम नावाच्या चित्रपटाला प्रेक्षकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे. अनेक जगभरातील चित्रपट महोत्सवांमध्ये मनोजच्या जोरामला प्रेक्षकांनी उस्फुर्त दाद दिली होती. त्याचे कौतुकही झाले होते.

अवश्य वाचा : शरद पवारांचे नाव व फोटो वापरणार नाही याची हमी द्या; सुप्रीम कोर्टाने अजित पवार गटाला फटकारले

भैय्याजी चित्रपट २४ मे ला प्रदर्शित होणार (Manoj Bajpayee)

मनोजनं त्याच्या भैय्याजी चित्रपटाचा पोस्टर रिलीज करताना त्याची रिलीज डेटही सांगितली आहे. मनोजनं त्याच्या इंस्टाग्राम अकांउंटवरुन तो फोटो शेयर केला होता. त्यावर त्यानं लिहिलं होतं की, आता ते येत आहे असे म्हटले होते. त्यानंतर काही वेळानं त्यानं भैय्याजी नावाच्या चित्रपटाचे पोस्टरही शेयर केले होते. त्या पोस्टर मधील मनोजचा लूक खूपच वेगळ्या प्रकारचा आहे. तोंडात सिगारेट, गळ्यात गमछा आणि चेहऱ्यावर करारीपणा अशा लूकमध्ये मनोज हा काही वेगळाच दिसतो आहे. त्याचा भैय्याजी नावाचा चित्रपट २४ मे २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here