Manoj Jarange : मराठा आंदोलन ३ मार्चपर्यंत स्थगित; मनोज जरांगेंनी दिली माहिती

मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी आज मोठी घोषणा केली. मराठा आंदोलन हे ३ मार्चपर्यंत स्थगित करण्यात येत असून, तोपर्यंत फक्त धरणे आंदोलन केले जाणार आहे. अशी माहिती जरांगे यांनी दिली आहे.

0
Manoj Jarange
Manoj Jarange

नगर : मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी आज मोठी घोषणा केली आहे. मराठा आंदोलन हे ३ मार्चपर्यंत स्थगित करण्यात येत असून, तोपर्यंत फक्त धरणे आंदोलन केले जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या परीक्षा असल्याने ३ मार्च पर्यंतचे आंदोलन स्थगित करण्यात येत असल्याची माहिती जरांगे यांनी दिली आहे.

विशेष म्हणजे पुढील आठ दिवस मराठा समाजाने शांत राहावे आणि सरकार काय करत आहेत हे पाहावे. तसेच, महाराष्ट्रातील मराठा समाजाला सांगतो आपल्यात चलबिचल नको, आपली ओबीसीमधून आरक्षणाची मागणी आहे, असेही मनोज जरांगे म्हणाले आहेत. छत्रपती संभाजीनगर शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत असतांना जरांगे यांनी माध्यमांशी संवाद साधला.

नक्की वाचा : मनोज जरांगेंची एसआयटी चौकशी होणार; नार्वेकरांचे आदेश   

‘दडपशाही रोखण्यासाठी मराठ्यांनी सरकारच्या वेबसाईटवर ईमेल करावे’ – मनोज जरांगे (Manoj Jarange)

यावेळी बोलतांना जरांगे म्हणाले की, “दडपशाही सुरू आहे, आंतरवाली सराटी येथील मंडप काढण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. त्यामुळे पोलिसांना विनंती आहे की, ते मंडप काढू नका आणि गावकऱ्यांवरील दडपशाही बंद करा. आजपासून दडपशाही रोखण्यासाठी करोडो मराठ्यांनी राष्ट्रपती, राज्यपाल यांना ई मेल करावे. सरकारच्या वेबसाईटवर ईमेल करावे, असे आवाहन देखील जरांगे यांनी केले आहेत.

अवश्य वाचा : एसआयटी चौकशीच्या आदेशावर मनोज जरांगेंची प्रतिक्रिया  

 ‘मी १० टक्के आरक्षण स्वीकारणार नाही’ – मनोज जरांगे (Manoj Jarange)

पुढे बोलतांना मनोज जरांगे म्हणाले की, “मी १० टक्के आरक्षण स्वीकारणार नाही, अटक करून जेलमध्ये टाकले तरी मी हटणार नाही. मी जेलमध्ये देखील आमरण उपोषण करेल. ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून जातीय द्वेष सुरू आहे. मी देवेंद्र फडणवीस यांना बोललॊ. मात्र याचा राग मराठ्यांच्या नेत्यांना आला. मराठा नेत्यांना जात की नेता हवा आहे, असा प्रश्न जरांगे यांनी उपस्थित केला. जातीने मतदान केले म्हणून तुम्हाला नेत्यांनी जवळ केले. तुमच्या स्वार्थासाठी मराठ्यांच नुकसान करू नका. यांनी मला अटक केली तरीही मराठा समाजाने शांततेत आंदोलन करावे, असेही जरांगे म्हणाले.  

हेही पहा : ‘समथिंग हटके’तून बाल संशोधकांचा आविष्कार  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here