Meta Down : नगर : फेसबुक चालवणाऱ्या कंपनी मेटाचा सर्व्हर डाऊन झाल्याने फेसबुक आणि इंस्टाग्राम ठप्प झाल्याने जगभरातील इंटरनेट युजर्सना मोठा फटका बसला आहे. फेसबुक आणि मेटाचा प्रसिद्ध फोटो आणि व्हिडीओ शेअरिंग प्लॅटफॉर्म इंस्टाग्राम अचानक काम करेनासा झाल्याने भारतासह जगभरातील इंटरनेट युजर्सचा हिरमोड झाला आहे. हजारो लोकांना त्यांचा अकाऊंट एक्सेस करताना अडचणींचा सामाना करावा लागला आहे.
हेही वाचा : गुटखा, पानमसाला विक्रेत्यांना थेट मकोका लागणार; तुकाराम मुंढे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश
सेवा ठप्प
Meta कंपनीचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स Facebook आणि Instagram दोन्ही सर्व्हर आज (ता. १२) साडे सात वाजण्याच्या सुमारास अचानक ठप्प झाले.त्यामुळे फेसबुक आणि इंस्टाग्रामचा वापर एप्स आणि अकाऊंट दोन्हींवर करताना युजर्सना अडचणीचा सामना करावा लागला. फेसबुकच्या अधिकृत साईटवर पेज रिफ्रेश केल्यानंतरही पेज रिफ्रेश होईना आणि स्क्रीनवर पांढरा पडदा दिसू लागला. तर काहींना Sorry,Something went Wrong असा संदेश होम पेजवर दिसू लागला. या सेवा ठप्प झाल्यानंतर आम्ही या बिघाडावर काम करत आहोत, लवकरच त्रूटी दूर केल्या जातील असे संदेश येऊ लागले.
नक्की पहा : मिरजगाव येथून प्रतिबंधित ड्रग्ज इंजेक्शनचा साठा जप्त; एकजण जेरबंद
लॉग-इन करताना अडचणी (Meta Down)
भारतातील अनेक शहरातील युजर्सना मेटाच्या मालिकीच्या प्लॅटफॉर्म वापरताना अडचणींचा सामना करावा लागला आहे. अर्ध्या तासांहून अधिक वेळ हा गोंधळ सुरु होता. त्यानंतर रात्री आठ वाजताच्या सुमारास फेसबुक पुन्हा सुरु झाले. त्यामुळे फेसबुकच्या युजर्सनी लागलीच मिम्स तयार करीत शेअर करायला सुरुवात केली. आज (ता. २) सायंकाळी ७.०१ वाजता १,०४,००१ तक्रारी आल्या. ५६ टक्के फेसबुक युजर्सना फेसबुक चालवण्यात अडचणी येत होत्या. तर २५ टक्के युजर्सना अकाऊंट लॉग-इन करताना अडचणी येत होत्या आणि ११ टक्के लोकांना फेसबुकच्या वेबसाईड एक्सेस करताना अडचणीच्या सामना करावा लागला.



