
नगर: महाकुंभमुळे चर्चेत आलेली ‘व्हायरल गर्ल’ मोनालिसा भोसले (Monalisa Bhosle) पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. फरमान खानसोबतच्या (Farman Khan) लग्नानंतर सुरू असलेल्या वादादरम्यान एका व्हिडिओने सर्वांनाच धक्का दिला आहे. या व्हिडिओत असा दावा करण्यात आला होता की, मोनालिसा पळून गेली आहे. आपण फरमान असल्याचं सांगत एका व्यक्तीने हा व्हिडीओ (Farman Viral Video) सोशल मीडियावर व्हायरल केला होता. मात्र आता या व्हिडिओमागचं सत्य (The Truth Behind the Video) समोर आले आहे.
नक्की वाचा: मराठी न येणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांचे लायसन्स रद्द होणार;’या’ दिवसापासून अंमलबजावणी
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये एका व्यक्ती स्वतःला फरमान खान म्हणवून घेत सांगितले होते की, मोनालिसा पळून गेली असून तो तिचा शोध घेत आहे. व्हिडिओमध्ये तो म्हणतो की, “हॅलो फ्रेंड्स, मी अजमेर-पुष्करला आलो आहे, मोनालिसा पळून गेली आहे, तिला शोधण्यासाठी मी इथे आलो आहे.” इंदूरच्या मोनालिसाशी केरळमध्ये लग्न करणाऱ्या फरमानसारख्या दिसणाऱ्या या व्यक्तीचा व्हिडीओ वाऱ्यासारखा पसरला, मात्र नंतर तो खोटा असल्याचं सिद्ध झालं आहे.
अवश्य वाचा: सराफ बाजारात सोन्याच्या दरात मोठा बदल, २२ व २४ k चे दर किती?
नेमकं काय घडलं? (Monalisa Viral Video)
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तो बनवणाऱ्या व्यक्तीने स्पष्ट केलं की, त्याचं नाव अरविंद जोशी असून तो राजस्थानच्या बाडमेरचा रहिवासी आहे. तो म्हणाला की, “मी हा व्हिडीओ केवळ मनोरंजनासाठी बनवला होता. मी फरमान नाही. काही लोक मला फरमान समजून कमेंट करत आहेत. मी फक्त कॉमेडी आणि मनोरंजनाच्या उद्देशाने हा व्हिडीओ बनवला होता. तो फरमान माझ्यासारखा दिसतो, म्हणून तुम्हाला तसं वाटलं असावं, असं त्याने सांगितलं आहे.
मोनालिसा अल्पवयीन असल्याचे झालं सिद्ध (Monalisa Viral Video)
महाकुंभात व्हायरल झालेली मोनालिसा सध्या तिच्या लग्नामुळे चर्चेत आहे. तिने मार्चमध्ये केरळमधील तिरुवनंतपुरम येथे फरमान खानशी हिंदू रितीरिवाजांनुसार लग्न केलं होतं. त्यानंतर मोनालिसाच्या कुटुंबीयांनी या विवाहाला ‘लव्ह जिहाद’ असं नाव दिलं आणि ती अल्पवयीन असल्याचा दावा केला. राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाच्या (NCST) चौकशीत महेश्वर सरकारी रुग्णालयातील नोंदीनुसार तिची जन्मतारीख ३० डिसेंबर २००९ असल्याचं समोर आलं आहे. याचा अर्थ लग्नाच्या वेळी तिचं वय १६ वर्षे २ महिने होतं. मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी २५ मार्च रोजी महेश्वर पोलीस ठाण्यात खानविरुद्ध अपहरण, पोक्सो कायदा आणि SC/ST कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.


