
MPSC drug inspector paper leak case : नगर : एमपीएससीमार्फत घेण्यात आलेल्या औषध निरीक्षक पदाच्या भरती परीक्षेचा पेपर फुटल्याचा (MPSC drug inspector paper leak case) गंभीर आरोप करणारे अहिल्यानगर येथील ऋषिकेश गांगर्डे (Rishikesh Gangarde) हे बुधवारी तोफखाना पोलीस ठाण्यात (Tofkhana Police Station) तक्रार दाखल करण्यासाठी उपस्थित झाले होते. मात्र या प्रकरणी तोफखाना पोलिसांकडून तक्रार दाखल करण्यास नकार दिला असल्याचा आरोप ऋषिकेश गांगर्डे यांनी केला आहे. गेल्या आठ दिवसात तक्रार दाखल न झाल्यास पुणे येथे उपोषण करण्याचा इशारा गांगर्डे यांनी दिला आहे.

सखोल चौकशी करण्याची मागणी
काही दिवसांपूर्वी ऋषिकेश गांगर्डे यांनी औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेचा पेपर परीक्षा होण्यापूर्वीच काही जणांकडे उपलब्ध झाल्याचा आरोप केला होता. या आरोपांमुळे राज्यभरात खळबळ उडाली असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणीही होत आहे. याबाबत गांगर्डे यांची सीआयडी कडून सहा तास चौकशी झाल्या असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तर अद्याप याबाबत संबंधित प्रशासनाने कुठलाही खुलासा केला नाही. त्यामुळे हे प्रकरण दाबले जाते काय असा आरोप त्यांनी केला आहे.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा.
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
गुन्हा दाखल न झाल्यास पुणे येथे आंदोलन (MPSC drug inspector paper leak case)
त्यासाठी ते आज अहिल्यानगर शहरातील तोफखाना पोलीस ठाणे तक्रार देण्यासाठी दाखल झाले होते. मात्र संबंधित प्रशासनाने तक्रार दाखल करण्यास नकार दिला आहे. मात्र,जोपर्यंत तक्रार दाखल होऊन व चाळीस हजार विद्यार्थ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही पाठपुरावा करणार. येथे आठ दिवसात गुन्हा दाखल झाला नाही तर पुणे येथे आंदोलन करू असे त्यांनी म्हटले आहे.


