Nagar : सोनी गिफ्टमध्ये प्रीमियम आणि युनिक घड्याळे विक्रीला

सोनी गिफ्टमध्ये प्रीमियम आणि युनिक घड्याळे विक्रीला

0
Nagar : सोनी गिफ्टमध्ये प्रीमियम आणि युनिक घड्याळे विक्रीला
Nagar : सोनी गिफ्टमध्ये प्रीमियम आणि युनिक घड्याळे विक्रीला

Nagar : नगर : प्रोफेसर कॉलनी चौक परिसरातील सोनी गिफ्ट फ्रँचायसी बाय डीबी व्हेंचर्स हे दालन अल्पावधीतच ग्राहकांच्या पसंतीचे आणि आकर्षणाचे केंद्र बनले असून, घरसजावटीच्या आकर्षक वस्तू, नामांकित बँड्सची उत्पादने आणि आधुनिक लाईफस्टाईलशी निगडित वस्तूंसाठी ओळख निर्माण केली आहे. आता या दालनामध्ये ग्राहकांसाठी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित कंपन्यांच्या प्रीमियम आणि युनिक घड्याळांच्या विशेष कलेक्शनचे आगमन झाले असून त्याचा शुभारंभ प्रख्यात उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. यावेळी जयराम डोडेजा, प्रकाश डोडेजा, साहिल डोडेजा, ईशा डोडेजा, नेहा डोडेजा यांच्यासह ग्राहक आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा : भारतीय नागरिक Reels वर नेमकं काय पाहतात? मेटाने केला मोठा खुलासा

प्रीमियम घड्याळांचे कलेक्शन

उद्योजक नरेंद्र फिरोदिया म्हणाले की, सोनी गिफ्टने नेहमीच ग्राहकांना दर्जेदार, विश्वासार्ह आणि आधुनिक वस्तू उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळेच या दालनाने अल्पावधीत ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे. सोनी गिफ्ट्स मध्ये आता जगप्रसिद्ध ब्रिटाइम लंडन या ब्रँडचे आकर्षक आणि प्रीमियम घड्याळांचे कलेक्शन उपलब्ध झाले आहे. पारंपरिक ब्रिटीश हॉरॉलॉजी आणि आधुनिक इंजिनियरिंग यांचा अप्रतिम संगम या घड्याळांमध्ये पाहायला मिळतो.

नक्की पहा : ग्रामसेवकाची ग्रामस्थांच्या मारहाण

प्रीमियम लाईफस्टाईलचा अनुभव (Nagar)

दर्जेदार उत्पादने, आकर्षक मांडणी, ग्राहकाभिमुख सेवा आणि सातत्याने नवीन संकल्पना आणण्याच्या प्रयत्नांमुळे सोनी गिफ्ट्स, अहिल्यानगर हे केवळ गिफ्ट शॉप न राहता प्रीमियम लाईफस्टाईल अनुभवाचे केंद्र बनत आहे. जर तुम्हाला प्रीमियम, युनिक आणि जागतिक दर्जाच्या घड्याळांची आवड असेल, तर सोनी गिफ्ट्समध्ये उपलब्ध झालेल्या ब्रिटाईम लंडन च्या विशेष कलेक्शनला अवश्य भेट द्या, असे आवाहन संचालकांनी केले आहे.