Nagar : नगर : एकल महिला धोरण अधिक व्यापक, लोकाभिमुख व वास्तवाधिष्ठित करण्याच्या उद्देशाने नागरिक, स्वयंसेवी संस्था, सामाजिक कार्यकर्ते, अभ्यासक, तज्ज्ञ व्यक्ती तसेच संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांचे अभिप्राय व सूचना जाणून घेण्यासाठी दि. १८ जून २०२६ रोजी सकाळी ११ वाजता छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, जिल्हा परिषद, अहिल्यानगर येथे जिल्हास्तरीय एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी संजय कदम यांनी दिली.
हेही वाचा : रोहित पवारांच अन्नत्याग आंदोलन तात्पूरतं स्थगित; गिरीश महाजन यांची शिष्टाई
विविध प्रश्न व समस्यांवर चर्चा
महिला व बाल विकास आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या निर्देशानुसार आयोजित करण्यात येणाऱ्या या कार्यशाळेत जिल्ह्यातील एकल महिलांशी संबंधित विविध प्रश्न व समस्यांवर चर्चा करण्यात येणार आहे. तसेच शासकीय योजनांचा लाभ, सामाजिक व आर्थिक सक्षमीकरण, आरोग्य, सुरक्षा, पुनर्वसन तसेच रोजगाराच्या संधींसंदर्भात विचारमंथन होणार आहे.
नक्की पहा : अहिल्यानगर जिल्ह्यात माव्यातून कोटींची उलाढाल; अन्न-औषधचे सात अधिकारी मैदानात
उपस्थितीचे आवाहन (Nagar)
या कार्यशाळेत नागरिक, एकल महिला, स्वयंसेवी संस्था, सामाजिक कार्यकर्ते, अभ्यासक, तज्ज्ञ व्यक्ती तसेच संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या सूचना व अभिप्राय नोंदवावेत, असे आवाहनही कदम यांनी केले आहे.



