Nagar Club : नगर क्लबच्या सचिवपदी नरेंद्र फिरोदिया यांची पाचव्यांदा निवडसर्व ११ संचालकांच्या जागा बिनविरोध

जिल्हाधिकारी हे पदसिद्ध अध्यक्ष असून सचिव आणि संचालकांची निवडणुकीद्वारे निवड केली जाते

0
Nagar Club : नगर क्लबच्या सचिवपदी नरेंद्र फिरोदिया यांची पाचव्यांदा निवडसर्व ११ संचालकांच्या जागा बिनविरोध
Nagar Club : नगर क्लबच्या सचिवपदी नरेंद्र फिरोदिया यांची पाचव्यांदा निवडसर्व ११ संचालकांच्या जागा बिनविरोध

Nagar Club : नगर : शहरातील प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या नगर क्लब (Nagar Club) संस्थेच्या संचालकांच्या सर्वच्या सर्व ११ जागांची निवडणूक बिनविरोध (Uncontested) झाली. सचिवपदी उद्योजक नरेंद्र फिरोदिया (Narendra Firodia) यांची पाचव्यांदा निवड झाली आहे. त्यांचा एकमेव अर्ज असल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली.

नक्की वाचा : जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकऱ्यांचा अपमान केल्याचा आरोप; संबंधित अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी

चार जणांनी उमेदवारी अर्ज घेतले मागे

बिनविरोध निवड झालेले संचालक पुढीलप्रमाणे- सुमतीलाल कोठारी, सीए अशोक पितळे, चेतन बोगावत, नीलेश चोपडा, अॅड. जयवंत भापकर, पवन गांधी, सत्येन गुंदेचा, डॉ. रवींद्र सोमाणी, आजेशकुमार धुप्पड, राहुल मुनोत, सीए नितीन पोखर्णा. संचालक मंडळाच्या ११ जागांसाठी १५ जणांचे अर्ज दाखल झाले होते. माघारीच्या मुदतीत विनीत ओबेराय, प्रवीण कटारिया, योगेश मालपाणी, दिलीप बोरा या चार जणांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

एकूण १ हजार ७५० सभासद (Nagar Club)

नगर क्लबचे एकूण १ हजार ७५० सभासद आहेत. दर तीन वर्षांनी निवडणूक होते. जिल्हाधिकारी हे पदसिद्ध अध्यक्ष असून सचिव आणि संचालकांची निवडणुकीद्वारे निवड केली जाते. उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची २७ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत अखेरची मुदत होती. चार जणांनी आपले उमेदवारी अर्ज माघार घेतल्याने निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सीए अमित फिरोदिया, अॅड. समीर सोनी यांनी काम पाहिले.