Nitin Jadhav : अरणगावमधील नितीन जाधव यांच्या १२ वर्षाच्या संघर्षाला यश; गावाला मिळवून दिला २२ लाखांचा कर

Nitin Jadhav : अरणगाववमधील नितीन जाधव यांच्या १२ वर्षाच्या संघर्षाला यश; गावाला मिळवून दिला २२ लाखांचा कर

0

Nitin Jadhav : नगर : अरणगाव (Arangaon) येथील मेहेराबाद (Meherabad) चे सुपुत्र नितीन जाधव (Nitin Jadhav) सर यांच्या तब्बल १२ वर्षांच्या अथक संघर्षाला अखेर यश प्राप्त झाले. गावाच्या हक्कासाठी आणि ग्रामपंचायतीच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी त्यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे अवतार मेहेरबाबा PPC ट्रस्टकडील (Avatar Meher Baba Perpetual Public Charitable Trust) थकीत कराची तब्बल ₹२२ लाखांची रक्कम अखेर अरणगाव ग्रामपंचायतीच्या स्वाधीन झाली आहे.

Nitin Jadhav : अरणगाववमधील नितीन जाधव यांच्या १२ वर्षाच्या संघर्षाला यश; गावाला मिळवून दिला २२ लाखांचा कर
Nitin Jadhav : अरणगाववमधील नितीन जाधव यांच्या १२ वर्षाच्या संघर्षाला यश; गावाला मिळवून दिला २२ लाखांचा कर

दीर्घ संघर्षाचा विजय

हा कर मिळविण्यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा सुरु ठेवला होता. तब्बल एक तपाचा कालावधी उलटूनही त्यांनी माघार न घेता आपला लढा सुरूच ठेवला. ही केवळ आर्थिक प्राप्ती नसून गावाच्या हक्कासाठी, पारदर्शक प्रशासनासाठी आणि जनहितासाठी लढलेल्या दीर्घ संघर्षाचा हा ऐतिहासिक विजय आहे. या उल्लेखनीय कार्याची दखल घेत नुकत्याच पार पडलेल्या ग्रामसभेमध्ये निवृत्त पीएसआय श्रीकांत (नाना) पाडळे यांनी नितीन जाधव सरांच्या कार्याचे विशेष कौतुक केले. तसेच गावाच्या वतीने आणि सर्व जागरूक तरुण मतदारांच्या उपस्थितीत त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

सातत्यपूर्ण पाठपुराव्याचे कौतुक (Nitin Jadhav)

या त्यांच्या कार्याला मानवंदना देऊन सातत्यपूर्ण पाठपुराव्याचे कौतुक करण्यात आले. गावाच्या विकासासाठी निस्वार्थपणे झटणारे, सत्याच्या बाजूने खंबीरपणे उभे राहणारे आणि जनतेच्या हक्कासाठी सातत्याने संघर्ष करणारे असे व्यक्तिमत्त्व समाजासाठी प्रेरणादायी आहे. अशा कार्यकर्त्यांचा सन्मान म्हणजे सकारात्मक सामाजिक परिवर्तनाचा गौरव होय.