One Village, One Ganpati : ‘एक गाव, एक गणपती’ला यंदा मर्यादित प्रतिसाद; २५५ गावांतच उपक्रम

एकत्रितपणे गणेशोत्सव साजरा करण्याचा उद्देश

0
One Village, One Ganpati : ‘एक गाव, एक गणपती’ला यंदा मर्यादित प्रतिसाद; २५५ गावांतच उपक्रम
One Village, One Ganpati : ‘एक गाव, एक गणपती’ला यंदा मर्यादित प्रतिसाद; २५५ गावांतच उपक्रम

One Village, One Ganpati : नगर : गणेशोत्सवाच्या (Ganeshotsav) पार्श्वभूमीवर गावागावांत गणरायाची प्रतिष्ठापना होत असताना प्रशासनाच्या ‘एक गाव, एक गणपती’ (One Village, One Ganpati) उपक्रमाला यंदाही मर्यादित प्रतिसाद मिळाला आहे. जिल्ह्यात एकूण ३ हजार ३१२ गणपतींची प्रतिष्ठापना करण्यात आली असून, त्यापैकी केवळ २५५ गावांत ‘एक गाव, एक गणपती’ उपक्रम राबविण्यात आला आहे. संपूर्ण गावाने एकत्र येऊन एकाच गणपतीची स्थापना करावी, यासाठी प्रशासनाकडून सातत्याने जनजागृती (Public Awareness) केली जात असली, तरी स्वतंत्र गणेश मंडळांची संख्या मोठी असल्याचे चित्र जिल्ह्यात दिसत आहे.

नक्की वाचा : नगर शहरात प्रथमच श्री छत्रपती शिवाजी महाराज चरित्र कथा सोहळ्याचे आयोजन

एकत्रितपणे गणेशोत्सव साजरा करण्याचा उद्देश

गेल्या अनेक वर्षांपासून प्रशासनाकडून तरुण मंडळे आणि सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये ‘एक गाव, एक गणपती’ उपक्रमाबाबत जनजागृती केली जाते. या उपक्रमामुळे गावातील सामाजिक एकोपा वाढण्यास मदत होते. तसेच उत्सवावरील अनावश्यक खर्चाला आळा घालून सर्वांनी एकत्रितपणे गणेशोत्सव साजरा करण्याचा उद्देश यामागे आहे. मात्र, मंडळांची संख्या आणि गणेशोत्सवातील वाढता उत्साह पाहता या उपक्रमाला अद्याप व्यापक प्रतिसाद मिळालेला नाही.

यंदा जिल्ह्यात २५५ गावांनी ‘एक गाव, एक गणपती’चा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये अकोले तालुका आघाडीवर असून, तेथील ४३ गावांत एकाच गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. दुसरीकडे कर्जत-जामखेड तालुक्यात केवळ एका गावात हा उपक्रम राबविण्यात आला आहे. त्यामुळे तालुकानिहाय या उपक्रमाला मिळणाऱ्या प्रतिसादात मोठी तफावत असल्याचे दिसून येते.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

‘एक गाव, एक गणपती’ स्वीकारणाऱ्या गावांची संख्या कमी (One Village, One Ganpati)

जिल्ह्यात यंदा ९८ खासगी गणपती, १ हजार ४३४ लहान सार्वजनिक गणेश मंडळे आणि १ हजार ५२५ मोठी सार्वजनिक गणेश मंडळे आहेत. या आकडेवारीच्या तुलनेत ‘एक गाव, एक गणपती’ स्वीकारणाऱ्या गावांची संख्या कमी आहे. दरम्यान, जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती असतानाही गणेशोत्सवाचा उत्साह कायम आहे. ढोल-ताशा, ढोलपथक आणि सनई चौघड्यांच्या गजरात गणरायाचे स्वागत करण्यात आले. उत्सवाच्या माध्यमातून गावकऱ्यांनी एकत्र येत सामाजिक सलोखा जपावा, यासाठी ‘एक गाव, एक गणपती’ उपक्रमाला अधिक व्यापक प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.