Ahilyanagar City : नगर : येथील श्री रामकृष्ण सेवा ट्रस्टच्या (Shri Ramakrishna Seva Trust) वतीने आपल्या ऐतिहासिक शहरात (Ahilyanagar City) प्रथमच श्री छत्रपती शिवाजी महाराज चरित्र कथा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. नवीन टिळक रोडवरील नंदनवन लॉन्स मध्ये २९ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता या सोहळ्याचा शुभारंभ राजेशाही थाटात केला जाईल. अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासचे महासचिव गोविंददेव गिरीजी महाराज (Govinddev Giriji Maharaj) यांच्या ओजस्वी वाणीतून हा कथा सोहळा साकारेल. सोहळ्याच्या उत्तम नियोजनासाठी विविध समित्यांची निर्मिती करण्यात आली असून जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष नंदलाल मनियार यांनी दिली.
नक्की वाचा : भारनियमनाच्या त्रासाला कंटाळून श्रीगोंदा तहसील कार्यालयावर वाद्य-मशाल मोर्चा
नंदलाल मनियार यांनी सांगितले की
ते म्हणाले, २९ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२६ दरम्यान दुपारी ३ ते सायंकाळी ७ या वेळेत कथा सोहळा चालेल. शनिवारी दिनांक ३ ऑक्टोबर २०२६ ला सकाळी ९ ते दुपारी १२ या वेळेत कथा होऊन सांगता केली जाईल. मंगळवारी दिनांक २९ सप्टेंबरला पहिल्या दिवशी शिवजन्म पूर्व काळ, तत्कालीन परिस्थिती, शिवजन्म ते स्वराज्याची शपथ, संतकार्य. दिनांक ३० सप्टेंबरला दुसऱ्या दिवशी कान्होजी जेधे, जावळीचा वेढा, प्रतापगड युद्धनिती, अफझलखान वध, गुरुवारी दिनांक १ ऑक्टोबरला तिसऱ्या दिवशी पावनखिंडीतील शौर्य, चाकणचा रणसंग्राम, लाल महालावर स्वारी (शाहिस्तेखानावर मात), प्रथम आरमार स्वारी, पुरंदरचा वेढा व तह. शुक्रवारी दिनांक २ ऑक्टोबरला चौथ्या दिवशी आग्रा येथून सुटका, छत्रसाल बुंदेला यांना प्रेरणा, सिंहगड अर्थात तानाजी मालुसरे शौर्यगाथा. शनिवारी दिनांक ३ ऑक्टोबरला पाचव्या दिवशी महाराजांचे विजय पर्व, शिवराज्याभिषेक, स्वराज्याची स्थापना, भारतव्यापी हिंदवी साम्राज्य अशा पद्धतीने कथा निरुपण होईल.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
या समित्यांचे संघटन (Ahilyanagar City)
या सोहळ्याचे स्वागताध्यक्ष नंदनवन उद्योग समुहाचे संजय जाधव हे आहेत. मंचचे प्रायोजक शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फाउंडेशन असून ३ ऑक्टोबरला होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळ्याचे यजमानपद सुमित संतोष वर्मा हे भूषविणार आहेत. वैदिक पद्धतीने होणारा शिवराज्याभिषेक सोहळा या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरेल.सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी संपर्क आणि समन्वय, मंडप आणि मंच व्यवस्था, आरती व्यवस्था, निमंत्रण पत्रिका वितरण, प्रचार-प्रसार, राज्याभिषेक उत्सव आदी समित्यांचे संघटन करण्यात आले आहे. शिवशाहीच्या इतिहासात योगदान दिलेल्या अहिल्यानगर शहरात प्रथमच श्री छत्रपती शिवाजी महाराज चरित्र कथा सोहळ्याचे शानदार आयोजन करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास युवा पिढीने जाणून घेणे आजच्या काळात अत्यावश्यक आहे, म्हणून या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
ट्रस्टच्या वतीने आवाहन
नगरकरांनी विशेषतः युवकांनी दररोजच्या कथा निरूपणाचा लाभ मोठ्या संख्येने घ्यावा, असे आवाहन श्री रामकृष्ण सेवा ट्रस्टचे अध्यक्ष नंदलाल मणियार, उपाध्यक्ष मोहनलाल मानधना, सचिव सुरेश चांडक, कोषाध्यक्ष मगनलाल पटेल, विश्वस्त सर्वश्री पुरुषोत्तम पटेल, सुभाष जग्गी, श्रीगोपाल धूत, डॉ. विजय भंडारी, मधुसूदन सारडा, रवींद्र गुजराथी, शरद झंवर, हर्षल शहा, रामेश्वर बिहाणी, विजय पंजाबी तसेच निमंत्रित कार्यकारिणी मंडळ सदस्य सर्वश्री हिरालाल पटेल, पुरुषोत्तम नावंदर, विपुल शहा, बजरंग दरक, नितीन मंत्री, राहुल जामगांवकर, राजेश डागा, बालकिसन जाखोटिया, भगवान फुलसौंदर, सोमनाथ नजान, हर्षा गुजराथी, सल्लागार अॅड. शरद पलोड आणि डॉ. शरद कोलते या मान्यवरांनी केले आहे.



