Local Crime Branch : लोणीतील खुनाच्या प्रयत्नाचा मुख्य आरोपी जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

Local Crime BrancLocal Crime Branch : लोणीतील खुनाच्या प्रयत्नाचा मुख्य आरोपी जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाईh : लोणीतील खुनाच्या प्रयत्नाचा मुख्य आरोपी जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

0
Local Crime Branch : लोणीतील खुनाच्या प्रयत्नाचा मुख्य आरोपी जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
Local Crime Branch : लोणीतील खुनाच्या प्रयत्नाचा मुख्य आरोपी जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

Local Crime Branch : नगर : लोणी येथील ब्राम्हणे वस्ती येथे दुचाकीवरून घरी जाणाऱ्या व्यक्तीवर चाकू, तलवार आणि लोखंडी रॉडने हल्ला (Attack with an iron rod) करून गंभीर जखमी केल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने (Local Crime Branch) मुख्य संशयित आरोपीला जेरबंद केले. गणेश उर्फ विकी आण्णासाहेब राक्षे (वय २८, रा. वेताळबाबा चौक, लोणी, ता. राहाता) असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचे (Accused) नाव आहे. त्याच्या चौकशीत या गुन्ह्यात सहभागी असलेल्या अन्य सात साथीदारांची नावे निष्पन्न झाली आहेत.

चाकू, तलवार आणि लोखंडी रॉडने मारहाण

५ सप्टेंबर रोजी रात्री सव्वाआठच्या सुमारास नागेश शंकर लोट (वय ३८, रा. लोणी) हे मोटारसायकलवरून घरी जात होते. ब्राम्हणे वस्ती परिसरात दोन मोटारसायकलींवरून आलेल्या चार ते पाच जणांनी त्यांना अडविले. त्यानंतर चाकू, तलवार आणि लोखंडी रॉडने त्यांच्या डोक्यात व पाठीवर मारहाण करण्यात आली. या हल्ल्यात लोट गंभीर जखमी झाले.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

लोणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (Local Crime Branch)

या प्रकरणी लोणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षकांनी स्थानिक गुन्हे शाखेला समांतर तपासाच्या सूचना दिल्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केला. दरम्यान, १६ सप्टेंबर रोजी पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, गणेश उर्फ विकी राक्षे हा लोणी गावातील जनावरांच्या बाजारात पांढऱ्या रंगाच्या कार मध्ये थांबलेला असल्याची माहिती मिळाली. पोलीस पथकाने तत्काळ तेथे जाऊन त्याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान राक्षे याने नागेश लोट यांच्यावर साथीदारांसह चाकू, तलवार आणि लोखंडी रॉडने हल्ला केल्याची माहिती दिली. त्याने दिलेल्या माहितीनुसार गुन्ह्यातील अन्य सात आरोपी निष्पन्न करण्यात आले आहेत.

ताब्यात घेतलेल्या आरोपीला पुढील तपासासाठी लोणी पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास लोणी पोलीस करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे आणि त्यांच्या पथकाने केली.