Operation Valentine Trailer : मानुषी छिल्लरच्या ‘ऑपरेशन व्हेलेंटाईन’ चा ट्रेलर लाँच 

पुलवामाचा हल्ला आणि त्यानंतर भारतीय हवाई दलाने केलेल्या एअर स्ट्राईकचा थरार आता रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. 'ऑपरेशन व्हेलेंटाईन' या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे.

0
Operation Valentine Trailer
Operation Valentine Trailer

नगर : पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याने (Pulwama Terror Attack) संपूर्ण भारत देश हादरला होता. आता हाच पुलवामाचा हल्ला आणि त्यानंतर भारतीय हवाई दलाने (Indian Air Force) केलेल्या एअर स्ट्राईकचा थरार आता रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. ‘ऑपरेशन व्हेलेंटाईन’ या चित्रपटाचा ट्रेलर लाँच (Operation Valentine Movie Trailer) करण्यात आला आहे. पुलवामामध्ये सुरक्षा दलाच्या जवानांवर झालेला दहशतवादी हल्ला आणि त्याच्या प्रत्युत्तरात भारतीय हवाई दलाने केलेल्या कारवाईच्या घटनेभोवती या चित्रपटाचे कथानक आहे.

नक्की वाचा : रितेश देशमुखचा नवा चित्रपट येणार ? नवं पोस्टर आलं समोर  

सलमान खानच्या हस्ते ट्रेलर लाँच (Operation Valentine Trailer)

बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानच्या हस्ते या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला. ट्रेलर शेअर करताना सलमानने कॅप्शनमध्ये ‘जो होगा देखा जाएगा’ असे म्हटले. तसेच चित्रपटाचा ट्रेलर लाँच करताना मला आनंद होत असल्याची भावना त्याने व्यक्त केली.

दोन भाषांमध्ये प्रदर्शित होणार चित्रपट (Operation Valentine Trailer)

‘ऑपरेशन व्हॅलेंटाईन’ चित्रपटाची कथा २०१९ साली झालेल्या पुलवामा हल्ल्यावर आधारित आहे. या चित्रपटात अभिनेता वरुण तेज आणि अभिनेत्री मानुषी छिल्लर प्रमुख भूमिकेत आहे. हा चित्रपट हिंदी आणि तेलगू भाषेत प्रदर्शित होणार आहे. एकीकडे सलमानने चित्रपटाचा ट्रेलर हिंदीत लाँच केला, तर दुसरीकडे राम चरणने तेलगू भाषेत चित्रपटाचा ट्रेलर लाँच केला आहे.शक्ती प्रताप सिंग यांनी दिग्दर्शित केलेला चित्रपट हा १ मार्च रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित करण्यात येणार आहे.

अवश्य वाचा : मनोज जरांगे पाटलांचा स्वतंत्र आरक्षणासाठी नकार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here