Osho Monsoon Festival : ओशो मान्सून फेस्टिव्हलमध्ये रंगणार ‘सुफी दरबार’; पवन श्रीकांत नाईक यांची सुरेल मैफिल

पवन श्रीकांत नाईक यांच्यासमवेत अनेक नामवंत सहकलाकार सहभागी होणार

0
Osho Monsoon Festival : ओशो मान्सून फेस्टिव्हलमध्ये रंगणार ‘सुफी दरबार’; पवन श्रीकांत नाईक यांची सुरेल मैफिल
Osho Monsoon Festival : ओशो मान्सून फेस्टिव्हलमध्ये रंगणार ‘सुफी दरबार’; पवन श्रीकांत नाईक यांची सुरेल मैफिल

Osho Monsoon Festival : नगर : पुण्यातील सुप्रसिद्ध ओशो इंटरनॅशनल मेडिटेशन रिसॉर्ट येथे ११ ते १५ ऑगस्ट या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या ‘ओशो मेडिटेशन अँड म्युझिक मान्सून फेस्टिव्हल’मध्ये (Osho Monsoon Festival) संगीतप्रेमींसाठी एक विशेष पर्वणी ठरणारा ‘सुफी दरबार’ (Sufi Darbar) हा कार्यक्रम रंगणार आहे. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शास्त्रीय आणि सुफी गायक पवन श्रीकांत नाईक (Pavan Shrikant Naik) यांच्या सादरीकरणामुळे या महोत्सवाला विशेष आकर्षण प्राप्त झाले आहे. मंगळवार, (ता. ११)  रात्री ९.३० ते ११.३० या वेळेत होणाऱ्या या विशेष मैफिलीत सुफी, भक्ती, शास्त्रीय आणि आध्यात्मिक संगीताचा अनोखा संगम अनुभवता येणार आहे. 

नक्की वाचा : कामकाज बंद ठेवण्याची महापालिका कामगार युनियनची घोषणा; धीरज परदेशी मृत्यू प्रकरण

संगीतप्रेमींमध्ये उत्सुकता

ध्यान, शांतता आणि संगीत यांचा मिलाफ घडवून आणणाऱ्या या कार्यक्रमाची संगीतप्रेमींमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.पवन श्रीकांत नाईक हे भारतीय शास्त्रीय संगीतासह सुफी गायनाच्या क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय स्तरावर परिचित नाव असून, त्यांनी भारतासह विविध देशांमध्ये आपल्या सुरांची मोहिनी घातली आहे. त्यांच्या सादरीकरणामध्ये अध्यात्म, प्रेम, मानवी मूल्ये आणि सूफी संतांचा संदेश प्रभावीपणे व्यक्त होत असतो. या मैफिलीत पवन श्रीकांत नाईक यांच्यासमवेत अनेक नामवंत सहकलाकार सहभागी होणार आहेत. कुलदीप चव्हाण, सुरज शिंदे, श्रेयस शित्रे, पवन तळेकर, नवरत्न वर्मा, निनाद पारखी, जयंत पाठक, पंकज शर्मा, सरोज पलाडिया, कल्याण मुरकुटे, पंकज नाईक, अथर्व कोरडे, मुलांशु परदेशी आणि संकेत गांधी हे कलाकार विविध वाद्यसंगती आणि स्वरांच्या माध्यमातून कार्यक्रमाला बहार आणतील.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

हा कार्यक्रम विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार (Osho Monsoon Festival)

तबला, हार्मोनियम, काहोन, बेंजो आणि इतर वाद्यांच्या सुरेल साथीत सादर होणारा ‘सुफी दरबार’ हा कार्यक्रम केवळ संगीत मैफल न राहता एक आध्यात्मिक अनुभव ठरणार असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे. सुफी संगीताच्या माधुर्यातून ध्यान आणि अंतर्मुखतेचा अनुभव देण्याचा प्रयत्न या कार्यक्रमातून केला जाणार आहे. ओशो मान्सून फेस्टिव्हलमध्ये देश-विदेशातील ध्यानसाधक, संगीतप्रेमी आणि पर्यटक सहभागी होत असतात. संगीत आणि ध्यान यांचा समन्वय साधणाऱ्या या महोत्सवामध्ये ‘सुफी दरबार’ हा कार्यक्रम विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे. संगीत, अध्यात्म आणि शांततेचा अद्वितीय अनुभव घेऊ इच्छिणाऱ्या रसिकांसाठी हा कार्यक्रम एक अविस्मरणीय पर्वणी ठरणार असून, पुण्यातील सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वातावरणाला या मैफिलीमुळे एक नवी उंची प्राप्त होणार आहे.