Pasaydan Award : राहुरी : आनंदवन सेवाभावी संस्था यांच्या वतीने दिला जाणारा पसायदान पुरस्कार (Pasaydan Award) साई आदर्श मल्टीस्टेटचे संस्थापक शिवाजीराव कपाळे (Shivajirao Kapale) यांना प्रदान करण्यात आला. साई आदर्शच्या माध्यमातून आदर्श व्यवहारामुळे सहकार (Cooperation) क्षेत्रामध्ये साई आदर्श मल्टीस्टेटचे चेअरमन शिवाजीराव कपाळे यांनी आपला वेगळा ठसा व अस्तित्व जिल्ह्यामध्ये निर्माण करून यशाच्या शिखराला गवसणी घातली आहे. त्यामुळे कपाळे यांना हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
नक्की वाचा : बनावट ब्रँडेड शॅम्पू विक्री करणारी टोळी जेरबंद;एमआयडीसी पोलिसांची नागापूर आठवडे बाजारात कारवाई
सामाजिक कामातही संस्था आघाडीवर
पारदर्शक व आर्थिक व्यवहारातून नगर जिल्ह्यामध्ये हजारो खातेदारांचा विश्वास संपादन करणारी साई आदर्श सहकारी क्षेत्रात अल्पावधीत आपल्या कर्तुत्वाच्या बळावर नावलौकिकास पात्र ठरलेली आहे. अर्थकारणा बरोबरच सामाजिक कामातही संस्था आघाडीवर असल्याने या संस्थेचे प्रशासन चोख पद्धतीने बजावणारे चेअरमन कपाळे यांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
यांची उपस्थिती (Pasaydan Award)
पुरस्कारानंतर कपाळे म्हणाले की, सहकार चळवळ ही ग्रामीण भागात आर्थिक नाडी म्हणून ओळखली जाते ही चळवळ आणखी वाढावी निकोप व्हावी अशी अपेक्षा आहे. या प्रसंगी उद्धव महाराज मंडलिक, सुनीता गडाख, पंढरीनाथ महाराज तांदळे, सूर्यकांत नेटके, डॉ. संजय सोनवणे, सुदामराव तागड, डॉ. बाबासाहेब शिरसाठ, शिवा बाफना, बडे, खाडे महाराज, पत्रकार सुखदेव फुलारी, विनायक दरंदले, संजय गर्जे ,गणेश डोंगरे, भाऊसाहेब ठोसर, डॉ रामनाथ बडे आदी उपस्थित होते



