PF Withdrawal : आता PF काढण्यासाठी हे काम करा, अन्यथा मिळणार नाही PF चे पैसे

0
PF Withdrawal : आता PF काढण्यासाठी हे काम करा, अन्यथा मिळणार नाही PF चे पैसे
PF Withdrawal : आता PF काढण्यासाठी हे काम करा, अन्यथा मिळणार नाही PF चे पैसे

नगर : नोकरदार वर्गासाठी ही अत्यंत महत्वाची माहिती आहे. तुमच्या पगारातून दरमहिन्याला कापला जाणारा जमा PF काढण्यासाठी (PF Withdrawal) आता तुम्हाला एक गोष्ट करणं महत्वाचं आहे. कारण जर ती प्रोसेस (PF Withdrawal Process) तुम्ही टाळलीत तर तुम्हाला EPFO कडून तुमचा निधी काढता येणार नाही. म्हणजेच तुमचा PF रखडू शकतो.

नक्की वाचा: चोरट्याचा गेम ओव्हर! चोरी करायला आलेल्या चोरट्याला महिलेनेचं पकडले

PF काढण्यासाठी e-KYC करणं अनिवार्य (PF Withdrawal)

EPFO च्या खाते धारकांना आता e-KYC करणं खूप गरजेचं आहे. बऱ्याचदा नोकरदार वर्ग याकडे दुर्लक्ष करतो. त्यामुळे ऐन वेळी त्यांना पीफचे पैसे काढता येत नाही. त्यासाठी तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड आणि बॅंक खातं हे व्हेरिफाय केलेलं असणं गरजेचं आहे. तरच तुम्हाला तुमचे पैसे मिळू शकतील. तुम्हाला यासाठी कुठेही जाण्याची गरज नाही. तसेच बॅंकेत जाऊन लांबच्या लांब रांगा लावण्याची गरज नाही, तुम्ही घरबसल्या ५ ते १० मिनिटांत ही प्रोसेस पूर्ण करु शकता.

अवश्य वाचा: लातूरमध्ये उष्माघाताचा पहिला बळी, शेतकऱ्याचा काम करताना दुर्दैवी अंत

कसं कराल e-KYC? (PF Withdrawal)

तुम्हाला EPFO KYC घरी अपडेट करायचे असेल तर सगळ्यात आधी EPFO च्या अधिकृत वेबसाईटवर जा. मग मेंबर-इ-सेवा या पर्यायावर क्लिक करा. तिथे तुमचा UAN नंबर आणि पासवर्ड टाकून लॉगिन करून घ्या. मग मॅनेज सेक्शनवर क्लिक करा. तुम्हाला KYC चा पर्याय दिसेल तो निवडा आणि तुमची माहिती भरा. यात कोणतीही चूक होणार नाही याची काळजी घ्या. नंतर आधार कार्डाशी लिंक असणारा तुमचा मोबाईल नंबरवर मेसेज येतील. त्यात असणारा ओटीपी टाकून सबमिट बटणावर क्लिक करा. तुम्हाल १ ते ६ दिवसात मंजुरीचा मेसेज येईल. या सोप्या स्टेप्सने तुम्ही घरबसल्या KYC करु शकता.