Police Officer | बदलीच्या विरोधात कबाडी थेट मॅटमध्ये; पोलीस अधीक्षकांनी दाखल केले होते कॅव्हेट

0
Police : जिल्हा पोलीस दलातील ३३ पोलीस नाईक झाले हवालदार
Police : जिल्हा पोलीस दलातील ३३ पोलीस नाईक झाले हवालदार

Police Officer | नगर : अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या (Police Officer) बदल्या झाल्या आहेत. यात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांची शिर्डी सुरक्षा विभागात बदली झाली. या बदलीविरोधात कबाडी यांनी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायप्राधिकरणाकडे (मॅट) धाव घेतली आहे. पोलीस निरीक्षक कबाडी यांनी बदलीचा आदेश रद्द करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे कायदेशीर पेच निर्माण झाला आहे. 

हे वाचा – मालेवाडीजवळ आढळली बेवारस अवस्थेतील पाच वर्षीय चिमुकली

१९ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी जिल्ह्यातील १९ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. पोलीस अधीक्षकांनी गुरुवारी (ता. ११) दोन स्वतंत्र आदेश काढले. त्यापैकी एका आदेशात किरणकुमार कबाडी यांच्या बदलीचा उल्लेख आहे. बदलीच्या आदेशानंतर पोलीस अधीक्षक सुदर्शन यांनी मॅटमध्ये कॅव्हेट दाखल केले होते. त्यांनी प्रशासनाचे म्हणणे ऐकून घेतल्याशिवाय कोणताही निर्णय देऊ नये, अशी मागणी केली आहे. त्याची नोटीस कबाडी यांना सोमवारी प्राप्त झाली. त्यांनी बदलीच्या आदेशाला अॅड. विश्वास वाघ यांच्यामार्फत आव्हान दिले आहे. 

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

कार्यकाळ तीन वर्षाचा

पोलीस निरीक्षक कबाडी यांची २३ जुलै २०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या प्रमुखपदी नियुक्ती झाली होती. त्यांचा कार्यकाळ तीन वर्षाचा होता. दहा महिन्यांत त्यांची बदली शिर्डी सुरक्षा विभागात करण्यात आली आहे. त्यांच्या कार्यकाळात पोलीस मुख्यालयातील मुद्देमाल कक्षातून अमली पदार्थाची विक्री झाली. 

अमली पदार्थाची विक्री

गुन्हे शाखेतील कर्मचाऱ्याने परस्पर अमली पदार्थाची विक्री केली. तो सध्या पोलिसांच्या अटकेत आहे. अमली पदार्थ सुरक्षेची जबाबदारी शाखेचे प्रमुख म्हणून कबाडी यांची होती. याबाबत वरिष्ठांकडून अहवाल मागविण्यात आला होता. पोलीस अधीक्षक सुदर्शन यांनी याबाबतचा अहवाल वरिष्ठ कार्यालयाला पाठविला असल्याचे समजते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here