Police Raid : श्रीरामपूरमध्ये बंद घरावर पोलिसांचा छापा; हत्यारे, मुलींची छायाचित्रे, संशयास्पद साहित्य पोलिसांच्या हाती

खैरे यांचा अधिकृत माहिती देण्यास नकार

0

Police Raid : श्रीरामपूर : शहरातील सरस्वती कॉलनी परिसरातील एका बंद घरावर (Closed House) पोलिसांनी सोमवारी (ता. १३) रात्री उशिरा धडक कारवाई (Action Taken) केली. या कारवाईत बंद घरातून हत्यारे, मुलींची छायाचित्रे, गर्भनिरोधक गोळ्या तसेच अन्य संशयास्पद साहित्य पोलिसांच्या हाती लागल्याची माहिती मिळाली आहे. 

नक्की वाचा : स्मार्ट मीटरमध्ये कॅमेरा असल्याचा आरोप; ग्राहक प्रतिनिधीसह यूट्यूब चालकाविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल

खैरे यांचा अधिकृत माहिती देण्यास नकार

जिल्हा पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या आदेशानुसार शीघ्र कृती दलाच्या २० हून अधिक जवानांनी ही कारवाई केली. संबंधित घर हे करारनाम्याद्वारे भाड्याने देण्यात आल्याची माहिती आहे. या कारवाईबाबत शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक विशाल खैरे यांनी अधिकृत माहिती देण्यास नकार दिला.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

पोलिसांची गुन्हेगारीविरोधात व्यापक मोहीम (Police Raid)

दरम्यान, शनिवारी (ता. ११) शहरातील तरुण व्यावसायिक आकाश शेखर दुबय्या यांच्या हत्येनंतर पोलिसांनी गुन्हेगारीविरोधात व्यापक मोहीम हाती घेतली असून, त्याचाच एक भाग म्हणून विविध ठिकाणी शोधमोहीम आणि धडक कारवाया सुरू आहेत.