Primary Teacher Bank | नगर : मागील नऊ महिन्यापूर्वी प्राथमिक शिक्षक बँकेत (Primary Teacher Bank) ज्या घडामोडी झाल्या त्यामध्ये राज्याने मोठ्या प्रमाणात हस्तक्षेप केला. परंतु जिल्ह्यातील सभासदांच्या तो लवकरच लक्षात आला आहे. गुरुमाऊली सदिच्छा मंडळाच्या जाहीरनाम्यानुसार आगामी दोन वर्षांच्या काळामध्ये शिक्षक बँक ही राज्यांमध्ये निश्चितपणाने अग्रगणी राहील, अशी ग्वाही शिक्षक नेते बापूसाहेब तांबे यांनी दिली.
नक्की वाचा : युपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर,शक्ती दुबे देशात प्रथम तर पुण्याचा अर्चित डोंगरे महाराष्ट्रात पहिला
अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी मतदान (Primary Teacher Bank)
जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी बुधवारी(ता.२३) मतदान झाले. यावेळी अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी कर्जतचे संचालक बाळासाहेब तापकीर तर उपाध्यक्षपदी राहत्याचे संचालक योगेश वाघमारे यांची निवड झाली. या निवडीनंतर ते बोलत होते.
अवश्य वाचा : मराठवाड्यात तीन महिन्यात २६९ शेतकऱ्यांनी केली आत्महत्या
बाळासाहेब तापकीर अध्यक्ष तर भाऊराव राहिंज उपाध्यक्ष (Primary Teacher Bank)
अध्यक्ष पदासाठी बाळासाहेब तापकीर यांना १२ मते मिळाली. तर विरोधी भाऊराव राहिंज यांना आठ मते मिळाली. तर एक मतपत्रिका कोरी टाकण्यात आली होती. त्यामुळे बाळासाहेब तापकीर यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
बापूसाहेब तांबे यांच्या नेतृत्वाखाली २०२२ साली जिल्ह्यातील सर्वसामान्य सभासदांनी जो विश्वास टाकला त्या विश्वासात पात्र राहून शिक्षक बँकेचा कारभार काटकसरीचा व सभासद हिताचा केला जाईल, अशी ग्वाही यावेळी अध्यक्ष तापकीर यांनी दिली.