Prohibition: डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर डीजेवर व्यक्तिगत गीते वाजवल्याने तीव्र निषेध

आमदार सत्यजित तांबे चांगलेच संतापले

0

Prohibition: संगमनेर: जगाला समतेचा व मानवतेचा मंत्र देणारे महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने मोठ्या उत्साहाने अभिवादन सुरू असताना महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर व्यक्तिगत आणि उडत्या चालीचे गीते वाजून चालू कार्यक्रमात गोंधळ निर्माण केल्याने या विकृत प्रवृत्ती विरोधात संगमनेर तालुक्यांमधून तीव्र संताप आणि निषेध (Prohibition) सुरू झाला आहे. डीजे वाजवणाऱ्यांवर आणि पोलीस प्रशासनावर आमदार सत्यजित तांबे यावेळी चांगले संतापले.
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानच्या वतीने व्याख्यान व जीवनगौरव पुरस्कार सुरू असताना काही कार्यकर्त्यांनी मुद्दाम गोंधळ निर्माण व्हावा, यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर काही व्यक्तिगत व उडत्या चालीची गीते सुरू केली. अत्यंत शांततेमध्ये सुरू असलेल्या कार्यक्रमांमध्ये वारंवार अडथळा निर्माण करण्याचे काम या कार्यकर्त्यांकडून सुरू होते. डीजेचा आवाज वाढवला जात होता. 

अवश्य वाचाखरातच्या कार्यक्रमात वरिष्ठ IPS अधिकाऱ्याची हजेरी; अंजली दमानियांचे गंभीर आरोप

आमदार सत्यजित तांबे चांगलेच संतापले (Prohibition)


यावर वारंवार सूचना करूनही या कार्यकर्त्यांनी ऐकले नाही. यावेळी व्यासपीठावरून आमदार सत्यजित तांबे चांगलेच संतापले. पोलीस प्रशासन काय करते आहे. महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्याचे विचार सांगण्याचे काम सुरू असताना काही लोक मुद्दाम होऊन अडथळे निर्माण करत आहेत. आम्ही 40 वर्ष जयंती मोठ्या आनंदाने सर्वांना घेऊन साजरी करत आहोत. हे कधी कुठे होते का ? असा सवाल करताना असे वर्तन अत्यंत चुकीचे आहे.तातडीने डीजे बंद करा अशा सूचना त्यांनी पोलिसांना दिल्या. यानंतर प्रांताधिकारी, तहसीलदार यांसह पोलीस त्या ठिकाणी हजर झाले. काही काळ डीजे बंद केल्यानंतर पुन्हा डीजे सुरू करण्यात आला. यानंतर मात्र वंचित बहुजन आघाडीच्या राज्य प्रवक्त्या उत्कर्षा रुपवते व ज्येष्ठ कार्यकर्त्या कुसुम माघाडे डीजे सुरू असलेल्या ठिकाणी आल्या आणि चांगल्या संतापल्या. यामुळे काही काळ मोठे तणावाचे वातावरण निर्माण झाले. सर्व रस्ते ट्रॅफिक जाम झाले. या ठिकाणी झालेल्या गोंधळामुळे प्रशासनाचीही तारांबळ उडाली.