नगर : पुण्यातील शिवाजीनगर (Pune Shivajinagar Crime) न्यायालय परिसरात आज (ता.२५) बुधवारी धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे पुण्यात कायदा- सुव्यवस्था आहे असा प्रश्न निर्माण झाला आहे. न्यायालयातील चेंबर क्रमांक ६३ बाहेर एका व्यक्तीवर चार अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केला आहे. यावेळी हल्लेखोरांनी दोन पिस्तुलांमधून गोळीबार (Firing) करण्याचा प्रयत्न केला. मात्र, गोळ्या न सुटल्याने त्यांनी संबंधित व्यक्तीवर कोयत्याने वार (An attack with a sickle) केले. या हल्ल्यात एक अज्ञात व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे. यात त्या पीडित व्यक्तीचे दोन हात शरीरापासून वेगळे झालेत.
नक्की वाचा : सण-उत्सवाच्या आनंदात झाडांना दुःख का?कायदा काय?
घटनेतील हल्लेखोर कोण? (Pune Shivajinagar Crime)
पुणे शिवाजी नगर कोर्टाच्या बाहेर गेट नंबर ४ च्या परिसरात ही घटना घडली. ज्या व्यक्तीवर हल्ला झाला, ती जखमी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मंदार किवळे असं जखमीचं नाव आहे. ते शुभम चव्हाण हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. २० एप्रिल २०२५ रोजी पुण्यातील कात्रज परिसरातील संतोषनगर येथे जमिनीच्या आर्थिक वादातून शुभम सुभाष चव्हाण याचा खून करण्यात आला होता. मंदार मारुती किवळे हा त्यातील आरोपी होता. चार दिवसांपूर्वीच तो कारागृहातून बाहेर आला होता. तो आज न्यायालयीन कामकाजासाठी आला असता, त्याच्यावर हल्ला करण्यात आला आहे. आता या संपूर्ण घटनेचा पुणे पोलीस तपास करत आहेत.
अवश्य वाचा : वेतन कपातीच्या मनमानीला लागणार चाप; राज्यभरात नवे नियम लागू, कर्मचाऱ्यांना होणार फायदा
जखमी ससून रुग्णालयात दाखल (Pune Shivajinagar Crime)
या हल्ल्यात संबंधित व्यक्ती जखमी अवस्थेत पडली होती. माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमी व्यक्तीला रिक्षातून ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे. या घटनेचे गांभीर्य ओळखून स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखा आणि फॉरेन्सिक टीमने घटनास्थळी धाव घेतली आहे. तपासणीदरम्यान घटनास्थळी रस्त्यावर बंदुकीचे मॅगझिन आणि एक मोबाईल फोन सापडला आहे. पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. पुण्यात गुन्हेगारीने टोक गाठले असून, थेट न्यायालयासमोरच अशा प्रकारे हल्ले होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या घटनेतील एका प्रत्यक्ष दर्शीने सांगितलं की, पाच सहा जण एका व्यक्तीवर कोयत्याने हल्ला करत होते. त्याच्या हातात बंदुकही होती. पण त्याच्यावर कोयत्याने वार केले. आम्ही कात्रजचे भाई असं म्हणत ते निघून गेले. त्याला वाचवण्यासाठी आम्ही १०८ ला फोन केला. पण संपर्क होऊ शकला नाही. यावेळी गोळीबार झाला नाही, त्यांनी फक्त धाक दाखवला. एक जण हातात बंदूक घेऊन कव्हर करत होता, बाकीचे तिघेजण वार करत होते”, असं त्यांनी सांगितलं आहे.



