Radhakrishna Vikhe Patil : सावेडी बस स्थानकामुळे प्रवाशांना अधिक सुसज्ज सुविधा उपलब्ध होणार : राधाकृष्ण विखे पाटील

बस स्थानकाचे काम गुणवत्तापूर्ण आणि वेगाने पूर्ण करण्याच्या सूचना

0

Radhakrishna Vikhe Patil : नगर : सावेडी परिसरासाठी स्वतंत्र बस स्थानकाची (Bus Stand) अनेक वर्षांची मागणी होती. या बस स्थानकामुळे प्रवाशांना मोठी सुविधा उपलब्ध होणार असून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था (Transport System) अधिक सक्षम आणि प्रवासीकेंद्रित होणार असल्याचे प्रतिपादन जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी केले.

नक्की वाचा : नावीन्यपूर्ण विकासकामांतून अहिल्यानगरला राज्यातील अग्रगण्य शहर बनविणार : राधाकृष्ण विखे पाटील

Radhakrishna Vikhe Patil : सावेडी बस स्थानकामुळे प्रवाशांना अधिक सुसज्ज सुविधा उपलब्ध होणार : राधाकृष्ण विखे पाटील
Radhakrishna Vikhe Patil : सावेडी बस स्थानकामुळे प्रवाशांना अधिक सुसज्ज सुविधा उपलब्ध होणार : राधाकृष्ण विखे पाटील

पदाधिकारी उपस्थित

मनमाड रोड परिसरात सुमारे ५ कोटी रुपयांच्या निधीतून उभारण्यात येणाऱ्या सावेडी बस स्थानकाच्या भूमिपूजन समारंभात पालकमंत्री डॉ. विखे पाटील बोलत होते. कार्यक्रमास आमदार संग्राम जगताप, महापौर ज्योतीताई गाडे, उप महापौर ऍड. धनंजय जाधव, महानगरपालिका आयुक्त यशवंत डांगे, राज्य परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक राजेंद्र जगताप यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

विखे पाटील म्हणाले की (Radhakrishna Vikhe Patil)

पालकमंत्री डॉ. विखे पाटील म्हणाले की, शहराचा वाढता विस्तार आणि प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता सावेडी परिसरात आधुनिक बस स्थानक उभारणे आवश्यक झाले होते. या बस स्थानकामुळे प्रवाशांना सुरक्षित आणि सुसज्ज सुविधा उपलब्ध होतील. प्रवाशांच्या सोयीसाठी राज्य परिवहन महामंडळाने अत्याधुनिक वातानुकूलित बसेस तसेच पर्यावरणपूरक ई-बसेस सुरू केल्या असून प्रवास अधिक आरामदायी आणि सुरक्षित करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचे ते म्हणाले.

नागरिकांमध्ये विश्वास आणि सुरक्षिततेची भावना निर्माण झाली

ते पुढे म्हणाले की, महिलांसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रवासात मोठ्या प्रमाणात सवलती देण्यात आल्या आहेत. त्यामुळे अधिकाधिक नागरिक सार्वजनिक वाहतुकीचा वापर करत असून महामंडळ अधिक लोकाभिमुख होत आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेबाबत नागरिकांमध्ये विश्वास आणि सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.

बस स्थानकाचे काम गुणवत्तापूर्ण आणि वेगाने पूर्ण करण्याच्या सूचना

बस स्थानकाचे काम गुणवत्तापूर्ण आणि वेगाने पूर्ण करण्याच्या सूचना देत त्यांनी प्रवाशांसाठी स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी, प्रतीक्षागृह तसेच इतर सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात. शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था लोकसहभागातून उभारण्याची सूचनाही त्यांनी यावेळी केली. कार्यक्रमास पदाधिकारी, महामंडळाचे अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.