Radhakrishna Vikhe Patil : प्रवाशांसाठी आधुनिक सुविधा उपलब्ध होणार – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

Radhakrishna Vikhe Patil : प्रवाशांसाठी आधुनिक सुविधा उपलब्ध होणार - पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

0
Radhakrishna Vikhe Patil : प्रवाशांसाठी आधुनिक सुविधा उपलब्ध होणार - पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील
Radhakrishna Vikhe Patil : प्रवाशांसाठी आधुनिक सुविधा उपलब्ध होणार - पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

पाच कोटींच्या निधीतून बसस्थानक उभारणी; सावेडी उपनगराला दिलासा

Radhakrishna Vikhe Patil : अहिल्यानगर : शहरातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या सावेडी नाका बस स्थानकाच्या (Savedi Naka Bus Stand) इमारतीच्या कामाला अखेर मुहूर्त लागला असून पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा उत्साहात संपन्न झाला. आमदार संग्राम जगताप (MLA Sangram Jagtap) यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे या महत्त्वाच्या कामाला चालना मिळाल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.

नक्की वाचा : विकास लवांडे यांच्यावरील भ्याड हल्ला अत्यंत दुर्दैवी : बाळासाहेब थोरात

या प्रसंगी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की,

“सावेडी बस स्थानकाच्या माध्यमातून प्रवाशांची मोठी सोय होणार आहे. अनेक ठिकाणी बस स्थानकांची अवस्था वाईट असून अस्वच्छता आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर असतो. मात्र आता एसटी महामंडळ प्रवाशांसाठी दर्जेदार सुविधा देण्यावर भर देत आहे. शिवशाही, शिवाई, इलेक्ट्रिक बस, लाल परी आणि हिरकणी बस अशा विविध सेवांमुळे प्रवाशांना अधिक चांगला अनुभव मिळत आहे. ते पुढे म्हणाले की, प्रवाशांच्या गरजा लक्षात घेऊन महिलांना ५० टक्के सवलत, ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास अशी सुविधा देण्यात आली आहे. सुरक्षित व सुलभ प्रवासामुळे नागरिकांचा एसटीकडे ओढा वाढला असून महामंडळही फायद्यात येत आहे.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

आमदार संग्राम जगताप यांनी सांगितले की, (Radhakrishna Vikhe Patil)

राज्य शासनाच्या माध्यमातून सावेडी बस स्थानकासाठी सुमारे पाच कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. सावेडी उपनगराचा विस्तार झपाट्याने होत असून या भागात नागरिकांची संख्या वाढत आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी सावेडी नाका येथे बस स्थानक उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या ठिकाणावरून नागरिकांना सहज प्रवास करता येईल. शासनाच्या सुविधा नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत.

Radhakrishna Vikhe Patil : प्रवाशांसाठी आधुनिक सुविधा उपलब्ध होणार - पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील
Radhakrishna Vikhe Patil : प्रवाशांसाठी आधुनिक सुविधा उपलब्ध होणार – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील


या भूमिपूजन सोहळ्यास आमदार संग्राम जगताप, महापौर ज्योतीताई गाडे आयुक्त यशवंत डांगे, उपमहापौर ॲड. धनंजय जाधव, महिला बालकल्याण उपसभापती वर्षा सानप, माजी महापौर बाबासाहेब वाकळे माजी उपमहापौर अनिल बोरुडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते, नगरसेवक कुमारसिंह वाकळे, मनोज कोतकर, सुरेश बनसोडे, मनोज दुल्लम, महेश लोंढे, विनायक देशमुख, रवींद्र बारस्कर, करण कराळे, दत्ता गाडळकर, नगरसेविका शारदाताई ढवण, सुजाता पडोळे आदी मान्यवर उपस्थित होते.