Radhakrishna Vikhe Patil : आधी स्वतःच्या पक्षाकडे पाहा; संजय राऊतांवर विखेंचा पलटवार

Radhakrishna Vikhe Patil : आधी स्वतःच्या पक्षाकडे पाहा; संजय राऊतांवर विखेंचा पलटवार

0
Radhakrishna Vikhe Patil : आधी स्वतःच्या पक्षाकडे पाहा; संजय राऊतांवर विखेंचा पलटवार
Radhakrishna Vikhe Patil : आधी स्वतःच्या पक्षाकडे पाहा; संजय राऊतांवर विखेंचा पलटवार

Radhakrishna Vikhe Patil : नगर : स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीच्या (Maharashtra MLC elections) पार्श्वभूमीवर महायुतीचे उमेदवार प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure) यांच्या उमेदवारीवरून राजकीय आरोप-प्रत्यारोपांना वेग आला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी तनपुरे यांना ‘राजकीय श्रद्धांजली’ वाहिल्याचे वक्तव्य केल्यानंतर महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले.

माध्यमांशी संवाद साधताना विखे पाटील म्हणाले की,

महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून प्राजक्त तनपुरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना विखे पाटील म्हणाले की, “संजय राऊत यांनी इतरांवर भाष्य करण्यापूर्वी स्वतःच्या पक्षाचा विचार करावा. सध्या त्यांच्या पक्षालाच श्रद्धांजली देण्याची वेळ आली आहे. त्यामुळे त्यांनी दुसऱ्यांबाबत बोलण्यापेक्षा स्वतःच्या पक्षाकडे लक्ष द्यावे.”

विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने प्राजक्त तनपुरे यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना अधिकृत उमेदवारी दिली आहे. त्यामुळे या निवडणुकीत तनपुरे महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून रिंगणात उतरले असून त्यांच्या उमेदवारीमुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणांना नवे वळण मिळाले आहे.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

संग्राम जगताप नाराज नसल्याचा दावा (Radhakrishna Vikhe Patil)

दरम्यान, नगर शहराचे आमदार संग्राम जगताप नाराज असल्याच्या चर्चांनाही विखे पाटील यांनी फेटाळून लावले. ते म्हणाले, “राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणतीही नाराजी नाही. आमदार संग्राम जगताप यांच्याशी माझे बोलणे झाले आहे. ते कोणतीही वेगळी भूमिका घेतील असे मला वाटत नाही.”
जगताप यांच्या नाराजीच्या चर्चांमुळे राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्कांना उधाण आले होते. मात्र विखे पाटील यांच्या वक्तव्यामुळे या चर्चांना पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे.

लाडकी बहीण योजनेबाबतही स्पष्टीकरण
लाडकी बहीण योजनेतून लाखो महिलांची नावे वगळल्याच्या चर्चांवरही विखे पाटील यांनी भूमिका स्पष्ट केली. राज्यभर सध्या केवायसी प्रक्रिया सुरू असून सरकारने निश्चित केलेल्या निकषांनुसार लाभार्थ्यांची पडताळणी केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.
“या प्रक्रियेत कोणावरही अन्याय होणार नाही. पात्र आणि खऱ्या लाभार्थींनाच योजनेचा लाभ मिळावा यासाठी ही पडताळणी सुरू आहे,” असे ते म्हणाले.


निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले
प्राजक्त तनपुरे यांच्या उमेदवारीनंतर जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असून विरोधकांकडून टीका आणि सत्ताधाऱ्यांकडून प्रत्युत्तरांचा सिलसिला सुरू झाला आहे. संजय राऊत आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्यातील शाब्दिक चकमकीमुळे विधानपरिषद निवडणुकीचे वातावरण आणखी तापण्याची चिन्हे दिसत आहेत.