Raghav Chadha : ‘आम आदमी पक्षा’चे (AAP) संस्थापक सदस्य आणि राज्यसभा खासदार राघव चड्ढा (Raghav Chadha) यांनी पक्ष सोडल्याची घोषणा केली. त्यामुळे दिल्लीच्या राजकारणात आज मोठा राजकीय भूकंप झाला आहे. विशेष म्हणजे, त्यांनी पक्षातील दोन-तृतीयांश खासदारांसोबत भाजपमध्ये विलीन होणार (Joining the BJP)असल्याचे जाहीर केले आहे. या खासदारांमध्ये क्रिकेटर हरभजनसिंग, संदीप पाठक यांच्यासह ७ खासदारांचा समावेश आहे. राघव चड्ढा यांनी आज संदीप पाठक आणि अशोक मित्तल यांच्यासह पत्रकार परिषद घेत ही घोषणा केली.
नक्की वाचा: आता PF काढण्यासाठी हे काम करा, अन्यथा मिळणार नाही PF चे पैसे
भाजपमध्ये विलिनीकरणाची घोषणा (Raghav Chadha)

यावेळी राघव चड्ढा यांनी सांगितले की, राज्यसभेतील आम आदमी पक्षाच्या दोन-तृतीयांश सदस्यांनी घटनात्मक तरतुदीनुसार भाजपमध्ये विलीन होण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी त्यांनी पक्षावर आपल्या मूळ मूल्यांपासून भरकटल्याचा आरोप केला. ते म्हणाले की, ज्या पक्षासाठी मी १५ वर्षे मेहनत घेतली, तो आता आपल्या मूलभूत तत्त्वांपासून दूर गेला आहे. हा पक्ष देशहिताऐवजी वैयक्तिक फायद्यासाठी काम करत आहे.
अवश्य वाचा: चोरट्याचा गेम ओव्हर! चोरी करायला आलेल्या चोरट्याला महिलेनेचं पकडले
भाजप नेतृत्वावर विश्वास (Raghav Chadha)
चड्ढा पुढे म्हणाले, राज्यसभेत ‘आप’चे १० खासदार आहेत आणि त्यापैकी दोन-तृतीयांशहून अधिक खासदार या बाबतीत आमच्यासोबत आहेत. त्यांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत आणि आज सकाळीच आम्ही ते स्वाक्षरी केलेले पत्र व संबंधित कागदपत्रे राज्यसभेच्या सभापतींकडे सादर केली आहेत. मी चुकीच्या पक्षात असल्याची जाणीव गेल्या काही वर्षांत होत होती. त्यामुळे आज मी पक्षापासून दूर होत असून जनतेच्या जवळ जात आहे. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाहांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत, आम्ही आमचा राजकीय प्रवास पुढे नेताना देशासाठी काम करू,असेही त्यांनी सांगितले.
राघव चड्ढांसोबत कोणते खासदार आहेत? (Raghav Chadha)
हरभजनसिंग
स्वाती मालीवाल
विक्रमजीत सिंह सहनी
राजेंद्र गुप्ता
संदीप पाठक
अशोक मित्तल



