Ramayana : नमित मल्होत्रा आणि यश यांची सिनेमा-कॉन २०२६ मध्ये उपस्थिती; ‘रामायण’मुळे भारतीय कथाकथनाचा जागतिक डंका

Ramayana

0
Ramayana : नमित मल्होत्रा आणि यश यांची सिनेमा-कॉन २०२६ मध्ये उपस्थिती; ‘रामायण’मुळे भारतीय कथाकथनाचा जागतिक डंका
Ramayana : नमित मल्होत्रा आणि यश यांची सिनेमा-कॉन २०२६ मध्ये उपस्थिती; ‘रामायण’मुळे भारतीय कथाकथनाचा जागतिक डंका

Ramayana : भारतीय चित्रपटसृष्टीसाठी (Indian Cinema) अभिमानाची गोष्ट ठरलेल्या ‘रामायण’ (Ramayana) या भव्य चित्रपटाची चर्चा सध्या जगभरात रंगली आहे. २०२६ मधील सर्वात मोठा सिनेमॅटिक सोहळा म्हणून या चित्रपटाकडे पाहिले जात आहे. दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होत असलेला हा महाकाव्यात्मक चित्रपट, निर्माता नमित मल्होत्रा यांच्या प्राईम फोकस स्टुडिओच्या बॅनरखाली साकारत आहे. यामध्ये आठ वेळा ऑस्कर (Oscar) जिंकलेल्या डीएनईजी या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या दृश्य-प्रभाव संस्थेचा तसेच सुपरस्टार यश यांच्या मॉन्स्टर माइंड क्रिएशन्सचा सहभाग आहे.

भगवान राम यांच्या भूमिकेची झलक पाहून प्रेक्षक थक्क

या चित्रपटाची झलक नुकतीच प्रदर्शित झाली असून, भगवान राम यांच्या भूमिकेची झलक पाहून प्रेक्षक अक्षरशः थक्क झाले आहेत. अत्याधुनिक दृश्य-प्रभाव, जबरदस्त ध्वनीरचना, दमदार कलाकार आणि अफाट भव्यता यामुळे ‘रामायण’ हा एक अनोखा अनुभव ठरणार आहे.

‘रामायण’ने उमटवली जागतिक छाप (Ramayana)

CinemaCon 2026 मध्ये ‘रामायण’ने आपली जागतिक छाप उमटवली आहे. या प्रतिष्ठित कार्यक्रमात जगातील मोठमोठ्या चित्रपटांसोबत ‘रामायण’नेही आपले स्थान निर्माण केले आहे. निर्माता नमित मल्होत्रा आणि सुपरस्टार यश यांनी या कार्यक्रमात उपस्थित राहून भारतीय कथाकथनाची ताकद जगासमोर मांडली.

निर्मात्यांनी सिनेमा-कॉन २०२६ मधील काही क्षण सोशल मीडियावर शेअर करत लिहिले

“सिनेमा-कॉनमध्ये ‘रामायण’चा प्रवास पुढे सुरूच

हा दोन भागांमध्ये सादर होणारा भव्य चित्रपट जगभरातील मोठ्या पडद्यांवर प्रदर्शित होणार आहे. पहिला भाग दिवाळी २०२६ मध्ये, तर दुसरा भाग दिवाळी २०२७ मध्ये प्रदर्शित होईल.