Rohit Pawar : कर्जत : प्रशासनाने (Administration) नियमावर चालताना दुजाभाव करू नये. कोणाला खुश करण्यासाठी कामात अडथळा आणणे चुकीचे आहे. कोण माणूस कोणाचा आहे याच्याशी आपल्याला वैयक्तिक काही देणे घेणे नाही. नियमात असेल तर काम झालेच पाहिजे. याची तक्रार असेल म्हणून रद्द करणे ठीक नव्हे. उद्या कोणी म्हणेल बीडीओ पैसे खातो. मी पण तेच म्हणायचे का ? असा सज्जड इशाराच आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी पंचायत समितीच्या (Panchayat Samiti) आढावा बैठकीत दिला.
नक्की वाचा : सीना नदी स्वच्छता अभियान उत्साहात; जलसंपदा व मनपा कर्मचाऱ्यांचा सहभाग

कामातील त्रुटींवरून सुनावले खडेबोल
यावेळी अनेक पदाधिकाऱ्यांनी पंचायत समितीच्या कार्यपद्धतीवर टीका करीत जाब विचारला. या बैठकीस गटविकास अधिकारी अजिंक्य सुर्यवंशी यांच्यासह सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते. आमदार रोहित पवार यांनी कर्जत पंचायत समितीत अधिकाऱ्यांची बुधवार (ता.२२) बैठक घेत विविध कामांचा आढावा घेतला. नागरिकांच्या प्रश्नांवर होत असलेल्या विलंबाबाबत त्यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारत काही महत्वाच्या कामातील त्रुटींवरून खडेबोल देखील सुनावले. शासकीय योजनांचा लाभ नागरिकांना वेळेत मिळावा आणि प्रलंबित कामे लवकर पूर्ण करावीत अशा सूचना दिल्या.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
प्रलंबित ठेवलेल्या प्रकरणावर आमदार पवार संतप्त (Rohit Pawar)
यावेळी अनेक नागरिकांनी, लाभार्थ्यांनी यासह पदाधिकाऱ्यांनी पाणीपुरवठा, रस्त्यांची दुरुस्ती, शेतीविषयक अडचणी तसेच वैयक्तिक प्रश्न आमदार रोहित पवार यांच्या समोर मांडले. त्यावर तात्काळ संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा अभिप्राय देखील घेतला. लाभार्थ्यांची त्रुटी असेल तर त्यांनी त्या त्वरित पूर्ण करून सादर करण्याचे सांगितले. मात्र, सर्व कागदपत्रे पूर्ण असून केवळ राजकीय द्वेषभावना मनात ठेवून प्रलंबित ठेवलेल्या प्रकरणावर आमदार पवार चांगलेच संतप्त झाले. प्रशासनाने सर्वसामान्य जनतेच्या हिताचे काम करावे. सत्ता कोणाची असो सर्वसामान्यांना न्याय देण्याचे प्रामाणिक काम अधिकाऱ्यांनी करावे अशी तंबी दिली.
या बैठकीस जेष्ठनेते बाळासाहेब साळुंके, माजी नगराध्यक्ष नामदेव राऊत, रघुआबा काळदाते, दिलीप जाधव, गणेश सुद्रीक, भूषण ढेरे यांच्यासह अनेक लाभार्थी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



