Sachin Jagtap : आयुर्वेद महाविद्यालयाच्या अध्यक्षपदी सचिन जगताप

Sachin Jagtap : आयुर्वेद महाविद्यालयाच्या अध्यक्षपदी सचिन जगताप

0
Sachin Jagtap : आयुर्वेद महाविद्यालयाच्या अध्यक्षपदी सचिन जगताप
Sachin Jagtap : आयुर्वेद महाविद्यालयाच्या अध्यक्षपदी सचिन जगताप

Sachin Jagtap : नगर : आयुर्वेद शास्त्र सेवा मंडळ व गंगाधरशास्त्री गुणे आयुर्वेद महाविद्यालयाचे (Gangadhar Shastri Gune Ayurved College) अध्यक्ष अरुण जगताप यांचे निधन झाल्याने रिक्त झालेल्या अध्यक्षपदी संस्थेचे सहसचिव व स्व.अरुणकाका जगताप (Arunkaka Jagtap) यांचे ज्येष्ठ चिरंजीव सचिन जगताप (Sachin Jagtap) यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.

नक्की वाचा : मोठी बातमी! मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ लोकल ट्रेनमधून पडून ५ जणांचा मृत्यू

संचालक मंडळाच्या वतीने अभिनंदन

आयुर्वेद शास्त्र सेवा मंडळाच्या संचालक मंडळाची नुकतीच महत्वाची बैठक झाली. या बैठकीत संस्थेचे मानद सचिव डॉ.विजय भंडारी यांनी संस्थेच्या अध्यक्ष पदासाठी सचिन जगताप यांच्या नावाची सूचना केली. त्यास संचालक अरविंद शिंदे व अनिल मुरकुटे यांनी अनुमोदन दिले. अध्यक्षपदी सचिन जगताप यांची निवड झाल्यावर संचालक मंडळाच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी उपस्थित सर्वांनी स्व.अरुणकाका जगताप यांच्या प्रतिमेस आदरांजली वाहिली. यावेळी आयुर्वेद शास्त्र सेवा मंडळाचे उपाध्यक्ष आमदार संग्राम जगताप, संचालक ज्ञानदेव पांडूळे, सुभाष घोडके, रत्नाकर कुलकर्णी, ठाकूर नवलानी, डॉ.एस. एस. व्हावळ, ज्ञानेश्वर रासकर, वैशाली ससे, गुणे आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.दत्तात्रय लोडे, उपप्राचार्य डॉ.सुरजसिंह ठाकूर, संस्थेच्या व्यवस्थापिका प्रतिभा भारदे, परिमल निकम आदी उपस्थित होते.

अवश्य वाचा : गृहकर्ज,वाहन कर्ज स्वस्त होणार;रिझर्व्ह बँकेने रेपो रेट घटवला

यावेळी सचिन जगताप म्हणाले, (Sachin Jagtap)

अरुणकाकांनी सर्वात जास्त वेळ या संस्थेच्या प्रगतीसाठी दिला. घराकडे न बघता समाजातील सर्व घटकातील नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी तसेच जिवलग मित्रांसाठी त्यांनी भरपूर वेळ दिला. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी जे काम सूरू केले ते मी पुढे नेणार आहे. हे पद सांभाळणे व स्व.अरुण्काकांची भूमिका निभावणे सोपे नाहीये. तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने व सहकार्याने ही जबाबदारी पेलणार आहे.

Sachin Jagtap : आयुर्वेद महाविद्यालयाच्या अध्यक्षपदी सचिन जगताप
Sachin Jagtap : आयुर्वेद महाविद्यालयाच्या अध्यक्षपदी सचिन जगताप

आमदार संग्राम जगताप म्हणाले, देवचक्के परिवाराने मोठ्या विश्वासाने ही संस्था ३४ वर्षांपूर्वी अरुणकाकांच्या हातात सोपवली. काकांनीही या संस्थेवर मुलाप्रमाणे प्रेम करत मोठी प्रगती केली आहे. त्यांच्या निधनाने या संस्थेची मोठी हानी झाली आहे. आता सचिन जगताप हे या संस्थेचे अध्यक्ष झाले आहेत. सचिन जगताप हे उपक्रमशील व सर्जनशील आहेत. त्यांना सर्व क्षेत्रांचे ज्ञान असल्याने ही संस्था ते योग्य पद्धतीने सांभाळतील. डॉ.विजय भंडारी म्हणाले, गुणेशास्त्रींनी लावलेल्या या झाडाचा अरुणकाकांच्या काळात वटवृक्ष झाला आहे. जसे काकांना सर्वांनी कायम सहकार्य केले तसेच आता या दोघांनाही सहकार्य करू. यावेळी उपस्थित सर्वांनी नूतन अध्यक्ष सचिन जगताप यांचे अभिनंदन करत मनोगत व्यक्त केले.