Sangram Jagtap : गोमातेच्या रक्षणासाठी मकोका सारखा कठोर कायदा व्हावा : संग्राम जगताप

Sangram Jagtap : गोमातेच्या रक्षणासाठी मकोका सारखा कठोर कायदा व्हावा : संग्राम जगताप

0
Sangram Jagtap : गोमातेच्या रक्षणासाठी मकोका सारखा कठोर कायदा व्हावा : संग्राम जगताप
Sangram Jagtap : गोमातेच्या रक्षणासाठी मकोका सारखा कठोर कायदा व्हावा : संग्राम जगताप

Sangram Jagtap : नगर : गोमातेच्या रक्षणासाठी कायदे केले मात्र आजही गोहत्या थांबलेली नाही गो हत्या थांबायचे असेल तर त्यासाठी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदा (मकोका) सारखा व्हावा या व इतर मागण्यांचे निवेदन आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वात तहसीलदार यांना देण्यात आले. गोमातेच्या रक्षणासाठी केंद्र शासनाने स्वतंत्र गोमंत्रालय स्थापन करावे आदी मागण्यांचे २१ हजार नगरकरांच्या सह्यांचे निवेदन तहसीलदार व नायब तहसीलदार यांना देण्यात आले.

हेही वाचा : शेतकऱ्याच्या बागेत पोपटांनी डाळिंब खाल्ली म्हणून कोर्टात १० वर्ष खटला चालला; नेमकं प्रकरण काय?

गोप्रेमींवर पुष्पवृष्टी

वारकरी संप्रदायातील विद्यार्थ्यांचे पूजन करून पदयात्रा मार्गस्थ झाली. यावेळी सर्व गोप्रेमीवर पुष्पवृष्टी करण्यात आली. कलानगर चौक, छत्रपती संभाजी महाराज चौक मार्गे समर्थ विद्यामंदिर वरून धर्मवीर चौक येथे पदयात्रा भजन संकीर्तन करत आली तेथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला गोसेवकांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला व तेथून सर्व गो सेवक तहसीलदार कार्यालयात जमा झाले.

नक्की पहा : राघव चड्ढा यांनी सांगितले पक्ष सोडण्याचे कारण

यांची उपस्थिती (Sangram Jagtap)

तहसीलदार, नायब तहसीलदार व अधिकाऱ्यांनी या पदयात्रेला कार्यालयाबाहेर सामोरे येत निवेदन स्वीकारले. याप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व तहसीलदार अहिल्यानगर यांना निवेदनाच्या प्रती देण्यात आल्या. याप्रसंगी दिनेश कुलकर्णी, भाजपा नेते महेंद्र गंधे, मिनल गंधे, नगरसेवक ऋग्वेद गंधे, बापू ठाणगे, डॉ.अर्जुन घुले, दिनेश खंडेलवाल, गोकुळ आठरे, सुरेखा सांगळे, भरत बोरुडे योगेश जामगावकर, भैय्या काशिद, संजय जोशी, राजन साळुंकै, अजित कटारिया, अजिंक्य गायकवाड, भारत शिंदे, अनिकेत शिंदे, माऊली गोशाळेचे संचालक माऊली व परीवार, ब्रह्मचैतन्य गोशाळेचे गौतम कराळे व सहकारी, गुंडेगाव येथील गोशाळेचे भापकर विविध गोशाळेचे संचालक विविध मंदिरांचे पुजारी, व्यापारी प्रतिनिधी अबाल वृद्ध व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.