लग्नाचे आमिष दाखवून महिलेचे लैंगिक शोषण; सात ते आठ वेळा गर्भपात केल्याचा आरोप
Sexual exploitation of a woman : राहुरी : लग्नाचे आमिष दाखवून एका महिलेचे तब्बल १२ ते १५ वर्षे वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन लैंगिक शोषण (Sexual exploitation of a woman) केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब सदाराम खेवरे (Raosaheb Sadaram Khevare) (रा. राहुरी) यांच्यासह दोन डॉक्टरांविरुद्ध श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात (Shrirampur City Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपींच्या मदतीने गर्भपात
पोलिसांत दाखल फिर्यादीनुसार, संशयित आरोपी खेवरे यांनी संबंधित महिलेची ओळख करून तिचा विश्वास संपादन केला. त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी श्रीरामपूर येथील संजयनगर परिसरातील घरी नेले. पुढे १२ ते १५ वर्षे वेगवेगळ्या ठिकाणी ठेवून महिलेच्या इच्छेविरुद्ध वारंवार शरीरसंबंध ठेवल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. या काळात महिला सात ते आठ वेळा गर्भवती राहिल्यानंतर संशयित आरोपींच्या मदतीने गर्भपात करण्यात आल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. यामध्ये राहुरी येथील डॉ. संजय दादा म्हसे आणि डॉ. अनंत शेकुकर यांनी मदत केल्याचा आरोप आहे. वारंवार गर्भपात केल्यामुळे महिलेच्या जीवितास धोका निर्माण झाल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
आरोपांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ(Sexual exploitation of a woman)
या प्रकरणी शहर पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक विशाल खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. प्रकरणातील आरोपांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. दरम्यान, या प्रकरणातील आरोपांची सत्यता पोलिस तपासातून स्पष्ट होणार आहे.



