नगर : गोहत्या (Cow slaughter) रोखण्यासाठी कार्यरत असलेल्या काही अतिउत्साही गो-रक्षक कार्यकर्त्यांनी, एका युवा शेतकऱ्याने लोणी येथील जनावरांच्या बाजारातून खरेदी केलेल्या गायी अडविल्या आणि गायीसह टेम्पो थेट पोलीस ठाण्यात नेला. पण ज्याला पकडलं तो स्वतः शेतकरी व एका देशपातळीवरील हिंदुत्ववादी संघटनेचा कार्यकर्ता असल्याचे समजताच ‘वाह, रे! गो रक्षक ? असे म्हणत कपाळावर हात मारण्याची वेळ आली. श्रीरामपूरमध्ये (Shirampur News)घडलेल्या या प्रकारामुळे या गो पालक शेतकऱ्याला चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला.
नक्की वाचा : पक्षांतरबंदी कायदा पुन्हा चर्चेत; कायदा नेमका काय?
नेमकी घटना काय घडली? (Shirampur News)
श्रीरामपूर मधील भोकर येथील एका युवा दुग्ध व्यावसायिक शेतकऱ्याने लोणी येथील जनावरांच्या बाजारातून दोन गायी खरेदी केल्या. त्या गायी घेवून तो भोकर येथे घरी येत असताना, दत्तनगर शिवारात एका हिंदुत्ववादी संघटनेच्या अतिउत्साही गोरक्षकांनी तो गायींचा टेम्पो अडविला. ‘तुम्ही गायी कापायला चालविल्या आहे, गाडी पोलीस ठाण्यात घ्या’ अशी धमकी दिली, गडबडलेल्या त्या शेतकऱ्याने त्यांची विनवणी करत ‘आमच्याकडे गायी खरेदीची पावती आहे. माझ्या घरी गायींचा गोठा आहे, हवे तर तुम्ही बघायला चला, आम्ही विक्रेते नाही, आम्ही पण हिंदूच आहोत’ असे सांगितले. त्यानी लागलीच पोलिसांचा ११२ क्रमांक फिरविला, अन् पोलिसांचे चक्र फिरले.
अवश्य वाचा : सत्य घटनेवर आधारित “एक होतं माळीण” चित्रपटाचा थरकाप उडवणारा टीजर प्रदर्शित
श्रीरामपूर पोलीस स्टेशनमध्ये काय घडलं? (Shirampur News)

गायीसह टेम्पो व मालक श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात दाखल झाले. हा शेतकरी पोलिसांचीही विनवणी करू लागला. पण तेथेही शेवटी तेच घडले. ‘साहेब येवू द्या, मग बघू,असं पोलिसांनी सांगितले. अखेर संबधीत शेतकऱ्याने भोकर येथील काही प्रमुखांशी संपर्क करत, घडलेला सगळं प्रकार त्यांना सांगितला. काही वेळात श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात भोकर येथील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचा जमाव जमा झाला.या काळात ज्या त्या कार्यकर्त्यांने आपआपल्या नेत्यांना घडलेला प्रकार सांगितल्याने, संबधीतांनीही शहर पोलीस ठाण्यात नव्यानेच हजर झालेले कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक विशाल खैरे यांच्याशी संपर्क केला.
अनेक जण तातडीने शहर पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले. सर्व प्रक्रीया होऊन अखेर त्या गायी सायंकाळी सात वाजता संबधीत शेतकऱ्यांच्या दारात पोहचल्या.याच दरम्यान टेम्पो पकडणाऱ्या त्या गोरक्षकांनी पोलीस निरीक्षक विशाल खैरे यांची भेट घेतली असता, त्यांनी लगेच सर्वांसमक्ष गायी घेतलेला युवा शेतकरी हा देखील आरएसएसचा कार्यकर्ता असल्याचे सांगितले. अन् तथाकथीत गोरक्षकांना कपाळावर हात मारण्याची वेळ आली. यावेळी पोलीस ठाण्यात भाजपाचे ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष प्रकाश चित्ते, तालुका उपाध्यक्ष भाऊराव सुडके, संघटक सतीष शेळके यांसह अनेकजण उपस्थित होते. या प्रकारात श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे ठाणे अमलदार संतोष परदेशी यांनी मोलाचे सहकार्य केले.



