Shrigonda Police : वाहतूकीचे नियम मोडणाऱ्यांवर श्रीगोंदा पोलिसांचा कारवाईचा बडगा; सहा दिवसांत पाच लाखांचा दंड वसूल

एकाच दिवसात ९४ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल

0
Shrigonda Police : वाहतूकीचे नियम मोडणाऱ्यांवर श्रीगोंदा पोलिसांचा कारवाईचा बडगा; सहा दिवसांत पाच लाखांचा दंड वसूल
Shrigonda Police : वाहतूकीचे नियम मोडणाऱ्यांवर श्रीगोंदा पोलिसांचा कारवाईचा बडगा; सहा दिवसांत पाच लाखांचा दंड वसूल

Shrigonda Police : श्रीगोंदा : शहरात मागील चार पाच दिवसांपासून वाहतूक नियम मोडणाऱ्या आणि विना नंबर प्लेट (Without number plate) फिरणाऱ्या वाहनधारकांविरुद्ध पोलिसांनी (Shrigonda Police) आक्रमक मोहीम हाती घेतली आहे. पोलिसांनी अवघ्या सहा दिवसांच्या कालावधीत पोलिसांनी तब्बल ३१२ केसेस दाखल केल्या असून, वाहनधारकांकडून (Vehicle Owner) पाच लाख ११ हजार १०० रुपये इतका मोठा दंड वसूल केला आहे. पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे नियमबाह्य वाहन चालवणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

नक्की वाचा : पाथर्डीतील आत्महत्या प्रकरणाला गंभीर वळण; तिघांविरोधात गुन्हा दाखल

शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी

शहरातील वाढती गुन्हेगारी, चोरीच्या गाड्यांचा सुळसुळाट आणि वाहतुकीला अडथळा ठरणारे नियमभंग रोखण्यासाठी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष मोहीम राबवली जात आहे. विना हेल्मेट प्रवास करणे, वाहन परवाना नसणे, गाड्यांच्या काचांना बेकायदेशीर ‘ब्लॅक फिल्म’ लावणे, ‘ट्रिपल सीट’ प्रवास करणे, विना नंबर प्लेटच्या गाड्या चालवणे या व इतर मोटर वाहन कायद्याच्या कलमांतर्गत पोलिसांनी शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी करून हा बडगा उगारला आहे.या सहा दिवसांच्या मोहिमेचाच एक भाग म्हणून गुरूवार (ता. १८) पोलिसांनी विना नंबर प्लेटच्या गाड्यांची कसून तपासणी केली.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

एकाच दिवसात ९४ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल (Shrigonda Police)

गुरूवार (ता. १८) एकाच दिवसात ४९ विना नंबरच्या दुचाकी ताब्यात घेण्यात आल्या. त्यापैकी ३४ वाहनांचे चेसी व इंजिन नंबर पडताळून, जागीच नंबर प्लेट बसवून व दंड करून सोडण्यात आले; तर कागदपत्रांची पूर्तता न झालेली १६ वाहने पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली आहेत. आजच्या एकाच दिवसाच्या कारवाईतून ९४ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिपरसे, पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार ही कारवाई करत आहेत. शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी ही मोहीम अशीच सुरू राहणार असल्याचे संकेत पोलिसांनी दिले आहेत.