
Simhastha Kumbh Mela : नगर : नाशिक आणि त्र्यंबकेश्वर नगरीत आज (३१ ऑक्टोबर) राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Droupadi Murmu) यांच्या हस्ते धर्मध्वजारोहण करून आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याचा (Simhastha Kumbh Mela) अत्यंत दिमाखात आणि भक्तीमय वातावरणात शुभारंभ करण्यात आला. कुंभमेळ्याच्या प्राचीन इतिहासात पहिल्यांदाच देशाच्या राष्ट्रपतींच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा पार पडल्याने नाशिकमध्ये एक नवा इतिहास रचला गेला आहे. नाशिकमध्ये रामकुंडावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सोहळा पार पडत असतानाच, त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) येथील पवित्र कुशावर्त तीर्थावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अधिकृत धर्मध्वजारोहण करण्यात आले.
नक्की वाचा : जिल्हा बँकेच्या निवडणुकीतून राम शिंदेंच्या दोन उमेदवारांची माघार; मतदान न करण्याचे आवाहन

रामकुंडावर विधिवत गंगापूजन व महाआरती
दुपारी ठीक १२ वाजून २ मिनिटांच्या शुभमुहूर्तावर नाशिकमधील पवित्र रामकुंड येथे ५१ फुटांच्या पंचधातूंच्या मुख्य धर्मध्वजस्तंभावर भगवा ध्वज फडकवण्यात आला. या सोहळ्यापूर्वी राष्ट्रपतींच्या हस्ते रामकुंडावर विधिवत गंगापूजन व महाआरती करण्यात आली. त्याच वेळी त्र्यंबकेश्वर येथील पवित्र कुशावर्त तीर्थावरही ३१ फुटांचा धर्मध्वज फडकवून कुंभपर्वाची नांदी झाली. मुख्यमंत्र्यांनी मंत्रोच्चारांच्या जयघोषात त्र्यंबकेश्वरचा अधिकृत धर्मध्वज फडकवला. ध्वजारोहणापूर्वी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कुशावर्त तीर्थावर विधिवत गंगा-गोदावरी पूजन आणि आरती करण्यात आली.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

१३ आखाड्यांचे साधू-महंत, महामंडलेश्व उपस्थित (Simhastha Kumbh Mela)
या ऐतिहासिक प्रसंगी ‘केशव शंखनाद पथक’ पुणे-नाशिक यांच्या शंखांच्या गजराने आणि वैदिक मंत्रोच्चाराने संपूर्ण त्र्यंबक नगरी भक्तीच्या रंगात न्हाऊन निघाली होती या ऐतिहासिक धार्मिक सोहळ्यासाठी राज्यपाल जिष्णूदेव वर्मा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार, शृंगेरी पीठाचे जगद्गुरू शंकराचार्य विधुशेखर भारती स्वामी यांच्यासह १३ आखाड्यांचे साधू-महंत, महामंडलेश्वर आणि हजारो भाविक उपस्थित होते. सुमारे २०० वर्षांनंतर शैव आणि वैष्णव पंथाचे संत-महंत एकाच व्यासपीठावर एकत्र आल्याने या सोहळ्याचे महत्त्व अधिकच वाढले आहे. या निमित्ताने संपूर्ण गोदाघाट आणि नाशिक नगरी आकर्षक विद्युत रोषणाईने व भगव्या रंगाने उजळून निघाली आहे.


