SS Retail : नगर : वेगवेगळ्या ब्रॅण्डचे मोबाइल फोन इतर अॅक्सेसरीची विक्री करणाऱ्या कोल्हापूरच्या मातीतील एसएस रिटेलच्या (SS Retail) आयपीओ (IPO) ला गुंतवणूकदारांनी उदंड प्रतिसाद दिलाय. त्याचबरोबर लिस्टिंगनंतर गुंतवणूकदारांनी रिटेसच्या शेअर्सला पसंती दिलीय. अवघ्या दोन दिवसात एसएस रिटेलची शेअर्सची किंमत दुप्पट झालीय. विशेष म्हणजे गुरुवारी शेअर बाजारात (Stock Market) पडझड असताना एसएस रिटेलचा शेअर जोरदार वाढत होता.
नक्की वाचा : स्वस्तात सोन्याचे आमिष दाखवणारी आंतरजिल्हा टोळी जेरबंद; १६०० ग्रॅम बनावट सोन्याचे दागिने व ११ मोबाईल हस्तगत
लिस्टिंगनंतर शेअर 76 टक्के वाढला
आयपीओची इश्यू प्राइज प्रतिशेअर 424 रुपये होता. बीएसईवर हा शेअर बुधवारी 50 टक्क्यांहून अधिक वाढीसह 639 रुपयांवर लिस्टिंग झाला. बुधवारीच हा शेअर 748 रुपयांवर उच्चांकावर गेल्याने अप्पर सर्किट लागले होते. लिस्टिंगनंतर हा शेअर 76 टक्के वाढला होता. गुरुवारी शेअर बाजारात पडझड सुरू होती. अनेक दिग्गज कंपन्यांची शेअर घसरले होते. पण एसएस रिटेलचा शेअर मात्र दिमाखात वाढत होता. गुरुवारी हा शेअर 888 रुपये उच्चांकावर गेलाय. म्हणजेच आयपीओमध्ये शेअर्स मिळणाऱ्यांचे दोनच दिवसात टुप्पट पैसे झालेत. तर लिस्टिंगनंतर शेअर खरेदी करणाऱ्यांना दोन दिवसात एका शेअर मागे अडीचशे रुपयांचा फायदा झालाय.
शेअर बाजारात दोन ट्रेडिंग सत्रात गुंतवणूकदारांना एसएस रिटेलच्या शेअरने मालामाल केलंय. गुरुवारी हा शेअर 772 रुपयांना ओपन झाला. तर 888 रुपयांवर उच्चांकावर गेला होता. तर 767.55 रुपये निच्चांकावर गेला होता. तर 812 रुपयांवर शेअर बंद झाला आहे. या कंपनीचे आज 40 लाख 36 हजार 123 शेअर्सची खरेदी-विक्री झाली. तर 13 लाख 57 हजार 752 शेअर प्रत्यक्ष डिलिव्हरीसाठी गेले आहेत.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
कोल्हापूरच्या कंपनीचा शेअर बाजारात डंका (SS Retail)
एसएस रिटेल ही कंपनी कोल्हापूर येथील सिद्धार्थ शाह यांनी स्थापन केलेली आहे. बुधवारी राष्ट्रीय शेअर बाजारात आणि मुंबई शेअर बाजारात कंपनीचे शेअर्स जोरदार प्रीमियमवर सूचिबद्ध झाले. यावेळी एसएस रिटेल्सचे संस्थापक आणि चेअरमन सिद्धार्थ शाह. संचालक सागर पाटील, दीपा, हर्षल पारेख, गुंतवणूकदार नरेंद्र फिरोदिया हे उपस्थित होते.
शेअर बाजारात एसएस रिटेलला पसंती का ?
SS Retail च्या शेअरमध्ये गुंतवणूकदारांकडून सातत्याने खरेदी होण्यामागे कंपनीची मजबूत अँकर बुक हे एक महत्त्वाचे कारण मानले जात आहे. IPO खुला होण्यापूर्वी कंपनीने अँकर गुंतवणूकदारांच्या माध्यमातून 14 संस्थात्मक गुंतवणूकदारांना 424 रुपये प्रति शेअर या दराने 34.52 लाख शेअर्सचे वाटप केले होते. यातून कंपनीने सुमारे 146.4 कोटी रुपये उभारले. या अँकर बुकमधील मोठा हिस्सा देशांतर्गत म्युच्युअल फंडांकडे गेला होता. कंपनीने 19 योजनांच्या माध्यमातून 11 देशांतर्गत म्युच्युअल फंडांना अँकर वाटपातील 83.14 टक्के म्हणजेच 28.70 लाख शेअर्स दिले होते.
यामध्ये SBI म्युच्युअल फंड, कोटक महिंद्रा अॅसेट मॅनेजमेंट कंपनी, ICICI प्रुडेंशियल अॅसेट मॅनेजमेंट कंपनी, अॅक्सिस म्युच्युअल फंड, WhiteOak Capital, मोतीलाल ओसवाल अॅसेट मॅनेजमेंट कंपनी, Invesco आणि Aditya Birla Sun Life अॅसेट मॅनेजमेंट कंपनी यांचा समावेश आहे. याशिवाय आशीष कचोलिया समर्थित Bengal Finance and Investment, Kotak Mahindra Life Insurance आणि 360 One यांनी मिळून सुमारे 25 कोटी रुपयांची गुंतवणूक केलीय.
IPO मधून उभारलेल्या पैशातून व्यवसाय विस्ताराची योजना
SS Retail चा एकूण IPO 500 कोटी रुपयांचा होता. यामध्ये 360 कोटी रुपयांचा फ्रेश इश्यू आणि 140 कोटी रुपयांचा ऑफर फॉर सेल (OFS) समाविष्ट होता. कंपनी फ्रेश इश्यूमधून मिळणाऱ्या मोठ्या रकमेचा वापर व्यवसाय मजबूत करण्यासाठी करणार आहे. उभारलेल्या निव्वळ निधीपैकी 241.3 कोटी रुपये अतिरिक्त कार्यकारी भांडवलाच्या गरजांसाठी राखून ठेवण्यात आले आहेत.कंपनीची आर्थिक वर्ष 2027 मध्ये 120 नवीन स्टोअर्स आणि आर्थिक वर्ष 2028 मध्ये आणखी 120 नवीन स्टोअर्स सुरू करण्याची योजना आहे.



