Stolen mobile phones returned : ८७ हरवलेले व चोरीस गेलेले मोबाईल शोधून नागरिकांना परत; अहिल्यानगर पोलिसांची कामगिरी

0
Stolen mobile phones returned : ८७ हरवलेले व चोरीस गेलेले मोबाईल शोधून नागरिकांना परत; अहिल्यानगर पोलिसांची कामगिरी
Stolen mobile phones returned : ८७ हरवलेले व चोरीस गेलेले मोबाईल शोधून नागरिकांना परत; अहिल्यानगर पोलिसांची कामगिरी

Stolen mobile phones returned : नगर : अहिल्यानगर शहर (Ahilyanagar City) उपविभागातील हरवलेले तसेच चोरीस गेलेले तब्बल ८७ मोबाईल (Stolen mobile phones returned) हँडसेट शोधण्यात अहिल्यानगर पोलिसांना यश आले आहे. सुमारे १८ लाख ८५ हजार रुपये किमतीचे हे मोबाईल संबंधित नागरिकांना परत करण्यात आले. पोलिसांच्या या कामगिरीमुळे मोबाईल हरवल्याने चिंतेत असलेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

हे मोबाईल मूळ मालकांकडे सुपूर्द

शुक्रवार, ६ नोव्हेंबर २०२६ पर्यंत कोतवाली, तोफखाना आणि भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यांच्या हद्दीत हरवलेले अथवा चोरीस गेलेले मोबाईल पोलिसांनी शोधून काढले. उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिपरसे यांच्या उपस्थितीत हे मोबाईल त्यांच्या मूळ मालकांकडे सुपूर्द करण्यात आले.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

१८ लाख ८५ हजार किंंमतीचे मोबाईल (Stolen mobile phones returned)

या कारवाईत कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्वाधिक ५४ मोबाईल शोधण्यात आले असून, त्यांची किंमत १४ लाख रुपये आहे. तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीतून २५ मोबाईल (४ लाख रुपये), तर भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीतून ८ मोबाईल (८५ हजार रुपये) शोधण्यात आले. अशा प्रकारे तिन्ही पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून एकूण ८७ मोबाईल, ज्यांची एकत्रित किंमत १८ लाख ८५ हजार रुपये आहे, ते नागरिकांना परत करण्यात आले.


ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे आणि अहिल्यानगर शहर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख, तोफखाना पोलीस ठाण्याची पोलीस निरीक्षक बालाजी वैद्य, भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक तेजश्री थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार पोलीस महेश पवार, सचिन बाचकर आणि संदीप थोरात यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
हरवलेले मोबाईल शोधून ते पुन्हा नागरिकांच्या हातात देण्याच्या पोलिसांच्या या कामगिरीचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.