Suicide : गळफास घेत ३५ वर्षीय व्यक्तीने संपवले जीवन; राहुरी फॅक्टरी येथील घटना

आत्महत्येमागील कारण अद्याप अस्पष्ट

0
Suicide : गळफास घेत ३५ वर्षीय व्यक्तीने संपवले जीवन; राहुरी फॅक्टरी येथील घटना
Suicide : गळफास घेत ३५ वर्षीय व्यक्तीने संपवले जीवन; राहुरी फॅक्टरी येथील घटना

Suicide : राहुरी : राहुरी फॅक्टरी (Rahuri Factory) येथील प्रसादनगर भागात सोमवारी (ता. १८) सकाळी एका ३५ वर्षीय व्यक्तीने गळफास घेऊन आपले जीवन संपवले(Suicide). सुभाष भीमा गायकवाड (वय ३५, रा. प्रसादनगर, राहुरी फॅक्टरी) असे या व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी राहत्या घरातील खिडकीला गळफास घेतल्याचे सकाळी निदर्शनास आले.

नक्की वाचा : मान्सून सक्रियतेबाबत अनिश्चितता; अवैध पाणी उपसा थांबवण्याचे आवाहन

पोलिसांची घटनास्थळी धाव

पोलीस हवालदार बाबासाहेब शेळके व प्रवीण बागुल यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी राहुरी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

कारण अद्याप अस्पष्ट (Suicide)

आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी पोलीस पुढील तपास करत आहेत.
मृत सुभाष गायकवाड यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली व एक मुलगा असा परिवार आहे.