नगर : संगीत जगतातून अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. आपल्या मधुर आणि सुश्राव्य आवाजानं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर (Suman Kalyanpur) यांचं निधन झालं (Passed away) आहे. वयाच्या 89 व्या वर्षी त्यांनी मुंबईतील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानं भारतीय संगीत क्षेत्रातील एका सुवर्ण युगाचा अंत झाला असून संगीत विश्वावर शोककळा पसरली आहे.
नक्की वाचा : आनंदवार्ता! मान्सून केरळमध्ये दाखल; महाराष्ट्रात कधी येणार?
मराठी भावगीत, भक्तीगीत आणि हिंदी चित्रपट संगीतात त्यांनी दिलेले योगदान कधीही न विसरता येणारं आहे. कला क्षेत्रातील त्यांच्या अफाट कामगिरीची दखल घेऊन केंद्र सरकारने 2023 साली त्यांना ‘पद्मभूषण’ या नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.
सुमन कल्याणपूर यांचा जन्म 28 जानेवारी 1937 रोजी बांगलादेशातील भवानीपूर येथे झाला होता. लहानपणापासूनच त्यांना संगीताची आवड होती. सुमनजींचे माहेरचे आडनाव ‘हेमाडी’ असे होते. त्यामुळे लग्नापूर्वी त्या सिनेसृष्टीत ‘सुमन हेमाडी’ या नावानेच गाणी गात असत आणि याच नावाने त्यांची सुरुवातीची गाणी लोकप्रिय झाली.
अवश्य वाचा : LPG महागला, देशभरात आजपासून ५ मोठे बदल! वाचा सविस्तर…

तलत महमूद यांनी सुमन यांचा आवाज ओळखला (Suman Kalyanpur Passed Away)
सुमन कल्याणपूर यांच्या संगीताच्या प्रवासाची सुरुवात गझलसम्राट तलत महमूद यांच्यामुळे झाली होती. एका जाहीर कार्यक्रमात गाणं गात असताना तलत महमूद यांनी सुमनताईंचा दैवी आवाज ऐकला. त्या आवाजाने प्रभावित होऊन तलत महमूद यांनी स्वतःच्या एका आगामी चित्रपटासाठी सुमनताईंना गाण्याची विचारणा केली. सुमनताईंनीही या सुवर्णसंधीला होकार दिला आणि तिथूनच त्यांचा चित्रपटसृष्टीतील यशस्वी प्रवास सुरू झाला. तर मराठी भावगीत गायनाची त्यांची सुरुवात ग. दि. माडगूळकर यांच्या अजरामर गीतांनी झाली.
सिनेसृष्टीतील प्रवास आणि गाजलेली गाणी (Suman Kalyanpur Passed Away)
रुपेरी पडद्यावरचं सुमन कल्याणपूर यांचं पहिलं गाणं ‘कोई पुकारे धीरेसे तुझे आँख के तारे’ हे होतं. या गाण्याने रसिकांना त्यांच्या आवाजाची भुरळ पाडली. सुमन कल्याणपूर जरी शुद्ध शास्त्रीय संगीत आणि नाट्यसंगीताकडे फारशा वळल्या नाहीत, तरी त्यांच्या गाण्यांमध्ये कमालीची शास्त्रीय बैठक होती. त्यांनी गायलेल्या ‘मन मोहन मन मे हो तुम्ही’ या अजरामर गीताला मानाचा ‘तानसेन पुरस्कार’ लाभला होता. त्यांनी केवळ मराठी आणि हिंदीच नाही, तर बंगाली, उडिया, पंजाबी, राजस्थानी, कानडी आणि भोजपुरी अशा अनेक प्रादेशिक भाषांमध्ये हजारो गाणी गायली. गझल, ठुमरी आणि भक्तीगीते गाण्यात त्यांना विशेष गोडी होती. सुमन कल्याणपूर यांच्या निधनाने संगीत क्षेत्रातील एक अथांग व्यक्तिमत्त्व हरपलं आहे.



