Sword Attack : जुन्या वादातून तरुणावर तलवारीने हल्ला; श्रीगोंदा येथील घटना

दोन्ही तळहातावर आणि कवटीवर गंभीर जखमा

0
Sword Attack : जुन्या वादातून तरुणावर तलवारीने हल्ला; श्रीगोंदा येथील घटना
Sword Attack : जुन्या वादातून तरुणावर तलवारीने हल्ला; श्रीगोंदा येथील घटना

Sword Attack : श्रीगोंदा : तालुक्यातील गणपतीमाळ परिसरात भावकीच्या जुन्या वादातून तरुणावर तलवारीने हल्ला (Sword Attack) करत गंभीर जखमी केल्याची घटना शनिवारी (ता. ११) दुपारी घडली. यामध्ये एक तरुण गंभीर जखमी (Seriously injured) झाला असून त्याला पुढील उपचारासाठी पुणे येथील खाजगी रुग्णालयात (private hospital) दाखल करण्यात आले. रोहिदास दांगडे असे या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. 

नक्की वाचा : मंत्री विखेंच्या पुढाकाराने जिल्ह्यात वारी नियोजनाचा पॅटर्न; वारकरी सांप्रदायाला दिलासा

अनेक दिवसांपासून सतत वाद

मिळालेल्या माहितीनुसार, जखमी तरुण आणि भावकीतील कुटुंबात गेल्या अनेक दिवसांपासून सतत वाद सुरू होते. त्यातील काही जणांची नुकतीच एका गुन्ह्यातून जामिनावर सुटका झाली होती. आज (ता. ११) झालेल्या या हल्ल्याच्या आगोदर संशयित आरोपी आणि त्याचे नातेवाईक मागील गुन्ह्यात पोलीस ठाण्यात हजेरीसाठी आले होते. त्यावेळी कामानिमित्त पाठीमागे थांबलेल्या रोहिदास याच्यावर चार ते पाच जणांनी मांडवगण रस्त्यावरील गणपती माळ परिसरात तलवार आणि धारदार शस्त्राने हल्ला केला. 

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

दोन्ही तळहातावर आणि कवटीवर गंभीर जखमा (Sword Attack)

जुन्या वादाची पार्श्वभूमी असलेल्या या घटनेत, संशयित आरोपींनी मिळून रोहिदास याच्यावर तलवारीने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात जखमी झालेल्या रोहिदासच्या दोन्ही तळहातावर आणि कवटीवर गंभीर जखमा झाल्या आहेत. जखमी तरुणाला तातडीने उपचारासाठी श्रीगोंदा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला पुण्यातील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. घटनेनंतर सर्व आरोपी घटनास्थळावरून पसार झाले असून, श्रीगोंदा पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. या प्रकारामुळे श्रीगोंदा परिसरात सध्या तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.