Alibaba Aani Chalishitale Chor :’अलीबाबा आणि ‘चाळीशी’तले चोर’ चा टिझर प्रदर्शित

'अलीबाबा आणि 'चाळीशी'तले चोर' हे नावच ऐकायला थोडंसं वेगळं वाटतं. मात्र आता याच नावाचा चित्रपट आपल्या भेटीला येणार आहे. नावातच आपल्याला कळतेय की, हा चित्रपट 'चाळीशी' भोवती फिरणारा आहे.

0
Alibaba Aani Chalishitale Chor
Alibaba Aani Chalishitale Chor

नगर : ‘अलीबाबा आणि ‘चाळीशी’तले चोर’ हे नावच ऐकायला थोडंसं वेगळं वाटतं. मात्र आता याच नावाचा चित्रपट आपल्या भेटीला येणार आहे. नावातच आपल्याला कळतेय की, हा चित्रपट ‘चाळीशी’ भोवती फिरणारा आहे. मात्र यात काही रम्य रहस्ये दडलेली आहेत. काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये लिपस्टिकचे एक निशाण दिसत होते. या निशाणाबाबत तर्कवितर्क काढत असतानाच आता या चित्रपटाचा जबरदस्त टिझर प्रदर्शित (Teaser Launch) झाला आहे.

नक्की वाचा : अवखळ इंदूच्या भेटीसाठी महाराष्ट्र आतूर ; ‘इंद्रायणी’ च्या शीर्षक गीताला प्रेक्षकांची पसंती

‘अलीबाबा आणि ‘चाळीशी’तले चोर’ च्या टीझरमध्ये काय ?(Alibaba Aani Chalishitale Chor)

‘अलीबाबा आणि ‘चाळीशी’तले चोर’ या चित्रपटाच्या टीझरमध्ये चाळिशीतील मित्र मैत्रिणी पार्टी एन्जॉय करताना दिसत आहेत. मात्र अचानक लाईट जाते व वेगळा आवाज ऐकू येतोय. लिपस्टिकचे निशाण, संशयास्पद आवाज, त्यात या वयाबाबत असलेला प्रत्येकाचा दृष्टिकोन पाहता हे काहीतरी धमाल मनोरंजन असणार हे नक्की झालं आहे. सध्या चाळीशीतील या चोरांबद्दलचे हे गूढ अधिकच वाढत आहे. मात्र ते जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना २९ मार्चपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

 आदित्य इंगळे यांनी केले चित्रपटाचे दिग्दर्शन  (Alibaba Aani Chalishitale Chor)

नितीन वैद्य प्रॉडक्शन्स प्रस्तुत, मृद् गंध फिल्म्स एल. एल. पी निर्मित या चित्रपटाचे आदित्य इंगळे दिग्दर्शक आहेत. या धमाल चित्रपटात मुक्ता बर्वे, सुबोध भावे, श्रुती मराठे, उमेश कामत, आनंद इंगळे, मधुरा वेलणकर आणि अतुल परचुरे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. विवेक बेळे लिखित या चित्रपटाचे नितीन प्रकाश वैद्य, वैशाली विराज लोंढे, निखिल वराडकर आणि संदीप देशपांडे निर्माते आहेत.

अवश्य वाचा : जान्हवी कपूरच्या ‘देवरा’ चं फर्स्ट लूक पोस्टर आऊट

चित्रपटाबद्दल दिग्दर्शक आदित्य इंगळे म्हणतात, ”हल्ली चाळीस हा वयाचा फक्त आकडा आहे. परंतु चाळीशीनंतर जगण्याची खरी मजा सुरु होते. हे असे वय आहे जिथे आपण तरुणही नसतो आणि वयस्करही. त्यामुळे या वयात एक वेगळीच भावना असते. चाळीशीतील हीच भावना या चित्रपटात मजेशीररित्या दाखवण्यात आली आहे. हा चित्रपट प्रेक्षकांचे नक्कीच मनोरंजन करेल. विशेषतः चाळीशीतील प्रेक्षकांना हा चित्रपट जास्त जवळचा वाटणार असल्याचे सांगण्यात आले आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here